शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी; बोगस बियाणे कंपन्यांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 11:16 IST

कंपन्यांच्यावतीने बोगस बियाण्यांची विक्री करण्यात येते. मात्र, यावर्षी पावसाने दडी दिली आहे.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्यांनी शेतामध्ये विविध पिकांच्या बियाण्यांची पेरणी केली. त्यांपैकी अनेकांचे बियाणे उगवलेच नाहीत. विविध कंपन्यांच्यावतीने बोगस बियाण्यांची विक्री करण्यात येते. मात्र, यावर्षी पावसाने दडी दिली आहे. परिणामी बियाणे न उगवण्याचे दुसरे कारण समोर आल्यामुळे पावसाची दडी बियाणे कंपन्यांच्या पथ्यावर पडली आहे.सध्या बहुतांश तालुक्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. मात्र, बियाणे उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी कृषि विभागाकडे येत आहेत. गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. पावसाने दडी दिल्यामुळे सुद्धा बियाणे उगवत नाहीत. सध्या शेतात असलेल्या बियाण्यांना बुरशी लागली आहे. त्यामुळे बियाणे उगवण्याची शक्यता कमी आहे. बियाणे बोगस असल्यामुळे उगवले नाहीत की पावसामुळे असा संभ्रम कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. बियाण्यांची उगवणक्षमता ६५ टक्के असणे आवश्यक असते. मात्र, नियमांचे उल्लंघन करीत अनेक कंपन्या बोगस बियाणे बनवितात. यावर्षी सुद्धा अशा कंपन्यांनी बियाण्यांची विक्री करण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे कृषि विभागाने शेतकºयांना घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. कोरोनाच्या काळात सभा व कार्यक्रम घेणे शक्य नसल्यामुळे वाहनांवर लाऊडस्पीकर लावून उगवण क्षमता कशी तपासावी, याबाबत मार्गदर्शन केले होते. कृषि विभागाच्या आवाहनानुसार शेतकºयांनी घरगुती बियाण्यांची पेरणी केली. मात्र, उगवण क्षमता तपासण्यात घोळ झाल्यामुळे अनेक शेतकºयांचे घरगुती बियाणेही उगवले नाहीत.बियाण्यांचा नमुना ठेवणे आवश्यकबियाणे विकत आणल्यावर पेरणी करीत असताना बियाण्यांचे काही नमुने ठेवणे आवश्यक आहे. सोयाबिनचे बियाणे कमीतकमी २५० ग्रॅम पेरणी न करता ठेवायला हवे. अन्य पिकांचे त्यापेक्षा कमी ठेवावे. पेरणी केल्यानंतर या नमुन्यांची तपासणी करून बियाणे योग्य आहे की नाही, याचा शोध घेणे शक्य होते.

गतवर्षी सोयाबिन सोंगणीच्यावेळी पाऊस आला होता. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सोयाबिन बियाण्यांमध्ये दोष आहे. त्यामुळेच तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकºयांनी घरच्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करायला हवी. विकतचे बियाणे घेताना सुद्धा ते शासनमान्य आहेत की नाही, बियाण्यांची उगवणक्षमता ७० टक्के आहे की नाही? हे तपासावे.- डॉ. आम्रपाली आखरे, संशोधक,डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाagricultureशेती