शैलगाव देशमुख परिसरात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST2021-08-20T04:40:10+5:302021-08-20T04:40:10+5:30

शेलगाव देशमुख येथील २५ ते ३० घरे पाण्याने वेढली गेली आहेत. शेलगाव देशमुख जवळच्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे ...

Rain in Shailgaon Deshmukh area | शैलगाव देशमुख परिसरात पाऊस

शैलगाव देशमुख परिसरात पाऊस

शेलगाव देशमुख येथील २५ ते ३० घरे पाण्याने वेढली गेली आहेत. शेलगाव देशमुख जवळच्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे शेलगाव देशमुखचा संपर्क तुटला आहे. नदीच्या पुरामुळे शेलगाव देशमुख बसस्थानकावरील वाॅर्ड नंबर पाचमधील काही घरे पाण्याने वेढली गेली असून या पाण्यामुळे या घराची व तसेच बसस्थानकावरील व्यावसायिकांचे त्यासोबतच या परिसरात असलेल्या विद्युत पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाचे पाणी अद्यापर्यंत वाढतच असून नदीचा पूर कमी होत नाही.

नागरिकांमध्ये भीती

या पुरामुळे गावात पाणी घुसले असून खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. नदीच्या पुरामुळे गावातील वाॅर्ड नंबर एक व पाच पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

180821\5827new doc 2021-08-18 19.30.31_1.jpg

शेलगाव देशमुख येथे आलेला पुर

Web Title: Rain in Shailgaon Deshmukh area