पावसाने पिकांना जीवदान; मात्र नदीनाले कोरडेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:36 IST2017-08-23T00:35:49+5:302017-08-23T00:36:22+5:30

जळगाव जामोद : गत तीन दिवसांत जळगाव जामोद तालुक्यात पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले, तरी नदीनाले मात्र कोरडेच आहेत. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खालावलीच आहे. सोबतच तालुक्यातील तीन लघुसिंचन प्रकल्पांमध्ये फक्त १७ टक्के पाणी असल्याने सिंचन व पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

Rain lifts crops; Only the riverine dryade! | पावसाने पिकांना जीवदान; मात्र नदीनाले कोरडेच!

पावसाने पिकांना जीवदान; मात्र नदीनाले कोरडेच!

ठळक मुद्देतालुक्यातील धरणात अत्यल्प जलसाठा, पाणी समस्या कायमसर्वाधिक पाऊस जळगावात, जामोदमध्ये सर्वात कमी 

जळगाव जामोद : गत तीन दिवसांत जळगाव जामोद तालुक्यात पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले, तरी नदीनाले मात्र कोरडेच आहेत. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खालावलीच आहे. सोबतच तालुक्यातील तीन लघुसिंचन प्रकल्पांमध्ये फक्त १७ टक्के पाणी असल्याने सिंचन व पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
जळगाव जामोद तालुक्यात वर्षभरात सरासरी पाऊस ६८३ मि.मी झाला आहे. म्हणजे फक्त ६३ टक्के पाऊस झाला आहे. या पावसाने नदी नाल्यांना पूर आला नाही. सध्या सर्व नद्या व नाले कोरडे आहेत. त्यामुळे विहिरींची पातळी अजूनही अत्यंत खालावलेली आहे. आता पावसाळ्याचा फक्त एक महिना बाकी आहे. १६ ऑगय्टपासून मद्या नक्षत्राला सुरुवात झाली आता पावसाचे पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती हे नक्षत्र बाकी असले तरी उत्तरा नक्षत्रानंतर पावसाची शक्यता मावळत जाते. नदी नाल्यांना पूर गेल्याशिवाय विहिरींची पाण्याची पातळी वाढत नाही. विहिरींची पाण्याची जर वाढली नाही तर रब्बी हंगामातील पिके घेणे कठीण होणार आहे. सोबतच पिण्याच्या पाण्याचीही समस्या भेडसावणार आहे.
जळगाव तालुक्यात राजुरा, गोडाडा व धानोरा अशी तीन छोटी धरणे आहेत. राजुरा धरणात सध्या १९.८0 टक्के जलसाठा आहे. म्हणजेच हे धरण ८0 टक्के खाली आहे. तसेच गोडाडा धरणात १६.६५ टक्के जलसाठा आहे. याचा अर्थ हे धरण ८४ टक्के रिते आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही धरणावरून पाणीपुरवठा योजना आहेत. राजुरा धरणावरून आसलगाव व खर्डा या गावांना पाणी पुरवठा केला जातो. तर गाडोडा धरणावरून जळगाव जामोद शहराची तहान भागविली जाते. येत्या महिन्याभरात जर धुवाधार पाऊस झाला नाही आणि ही धरणे अशीच रिती राहिली तर या गावांची पिण्याच्या पाण्याची काय स्थिती होईल, याची कल्पनाही करू शकत नाही. धानोरा धरणात फक्त १६.१६ टक्के जलसाठा आहे. या धरणावरून कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. तसेच या धरणाचे पाणी सिंचनासाठी फार वापरले जात नाही; परंतु हे धरण जर रिकामे राहिले तर सभोवतालाच्या सर्व विहिरी या कोरड्या होतात. त्यामुळे मानवासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची मोठी समस्या तयार होते.
एकूणच गत तीन दिवसांत पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली झाली आहे. सर्व खरीप पिकांना अक्षरश: जीवदान मिळाले आहे; परंतु विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ न होणे, धरणात जलसाठा अत्यंत कमी असणे व नदीनाले कोरडे असणे, ही बाब अत्यंत चिंतेची झाली आहे. सन २0१६ मध्ये २२ ऑगस्टपर्यंत जळगाव तालुक्यात सरासरी पाऊस ४९0 मि.मी. झाला होता. तर सन २0१६ मध्ये याच तारखेपर्यंत ५४0 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी फक्त ४३३ मि.मी. पाऊस झाला म्हणजेच मागील दोन्ही वर्षांपेक्षा यावर्षी सध्यातरी पाऊस कमी आहे. येत्या एक महिन्यात जर पावसाने ही सरासरी वाढविली नाही तर तालुक्याची स्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते.

सर्वाधिक पाऊस जळगावात, जामोदमध्ये सर्वात कमी 
जळगाव तालुक्यात जळगाव, जामोद, वडशिंगी, आसलगाव व पिंपळगाव काळे, अशा पाच मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. २२ ऑगस्टपर्यंत सर्वाधिक ५३२ मि.मी. पाऊस जळगाव येथे झाला तर सर्वात कमी ३३६ मि.मी. पावसाची नोंद जामोद येथे झाली आहे. म्हणजे जळगाव व जामोद या १0 कि.मी. अंतरात २00 मि.मी. पावसाचा फरक आहे. मंगळवारपर्यंत वडशिंगी येथे ४५६, आसलगाव येथे ३९३ तर पिंपळगाव काळे येथे ४४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याचाच अर्थ तालुक्यात सर्वत्र सारखा पाऊस नाही. मोठी तफावत दिसून येते याचाही परिणाम पिकांच्या स्थितीवर होत असतो. 

Web Title: Rain lifts crops; Only the riverine dryade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.