अर्धा तास कोसळला अवकाळी पाऊस
By Admin | Updated: November 11, 2014 23:54 IST2014-11-11T23:54:17+5:302014-11-11T23:54:17+5:30
खामगाव परिसरात पाऊस, सोंगून ठेवलेल्या ज्वारीला कोंब फुटण्याची शक्यता.

अर्धा तास कोसळला अवकाळी पाऊस
खामगाव (बुलडाणा) : शहर व परिसरात तसेच शेगाव तालुक्यातही आज दुपारच्या सुमारास सुमारे अर्धा तास अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे पिकांना फायदा ऐवजी नुकसानच होत असल्याचे मत शेतकर्यांनी व्यक्त केले. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक आभाळ भरुन येत दमदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सुमारे अर्धा तास बरसला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली, तर शेतकर्यांना सोंगणीची कामेसुद्धा थांबवावी लागली. ज्वारीचे पीक वाळले असून, अनेकांनी सोंगून ठेवले आहे. अनेकांचे खुळणीचे काम अद्यापही झालेले नाही. त्यामुळे ज्वारी पिकाचे या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पावसामुळे सोंगून ठेवलेल्या ज्वारीला कोंब फुटण्याची शक्यता आहे.