शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

रेल्वे मालधक्क्यावरील हमालांचे काम बंद आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:04 AM

खामगाव: हमालीचे दर कमी केल्याच्या कारणावरून येथील रेल्वे धक्क्यावरील माथाडी कामगार आणि हमाली व ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंत्राटदारांमध्ये वाद सुरू असून, कामगारांनी मागील आठ-नऊ दिवसांपासून रेल्वे धक्क्यावर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

ठळक मुद्देहमालीच्या दरावरून माथाडी कामगार, कंत्राटदारांमध्ये वाद

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: हमालीचे दर कमी केल्याच्या कारणावरून येथील रेल्वे धक्क्यावरील माथाडी कामगार आणि हमाली व ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंत्राटदारांमध्ये वाद सुरू असून, कामगारांनी मागील आठ-नऊ दिवसांपासून रेल्वे धक्क्यावर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. येथील रेल्वे धक्क्यावरील हमाली व ट्रान्सपोर्टचा कंत्राट नव्याने धुळे येथील जोशी फ्राइट क्लिचर कंपनीला मिळाला आहे. कंपनीकडून धक्क्यावरील हमालांच्या मजुरीत कपात करण्यात आल्याने या विरोधात धक्क्यावरील सर्व हमालांनी संताप व्यक्त करीत १६ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अगोदर अमरावती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्टकडे हा कंत्राट होता. तेव्हा मजुरांना ७0 रुपये मेट्रिक टनप्रमाणे मजुरी दिली जात होती; मात्र जोशी फ्राइट क्लिचर कंपनी धुळेकडून नवीन दर जाहीर करण्यात आले असून, प्रती मेट्रिक टन फक्त २४ रुपये मजुरी देण्यात येत आहे. या विरोधात सर्व माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून, ऐन दिवाळीच्या दिवसात कामगारांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे रेल्वेच्या संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देऊन कामगारांना पूर्वीचे दर लागू करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माथाडी कामगारांकडून होत आहे. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी