रायगावात पावसाचे पाणी साचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:30+5:302021-06-20T04:23:30+5:30
ग्रामीण भागातील बससेवा अद्याप बंदच जानेफळ : लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली; ...

रायगावात पावसाचे पाणी साचले
ग्रामीण भागातील बससेवा अद्याप बंदच
जानेफळ : लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली; मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा सुरळीत झाली नाही. बससेवा बंद असल्याने ग्रामस्थांना बुलडाणा व इतर गावांमध्ये जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे रखडली
माेताळा : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरूस्ती पावसामुळे रखडली आहे. ग्रामीण भागात गावांना जाेडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत़. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे़
ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले
धामणगाव धाड : डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याकडे कल वाढला असून, सद्यस्थितीत मशागत ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे. खरिपात लागवडीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत.
ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन रखडली
किनगाव राजा : परिसरातील संजय गांधी निराधार योजनेतील वृद्धांना गेल्या काही दिवसांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यांना मानधन देण्याची मागणी होत आहे.
डाेणगाव परिसरात अवैध वृक्षतोड
डाेणगाव : परिसरात गत काही दिवसांपासून अवैध वृक्षताेड माेठ्या प्रमाणात वाढली आहे. महामार्गाच्या दाेन्ही बाजूला असलेली जुनी झाडे ताेडून त्यांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
प्रधानमंत्री जीवनदायी योजनेचा लाभ द्या
सुलतानपूर : प्रधानमंत्री जीवनदायी योजनेचे सर्वेक्षण करून त्याचा गोरगरीब रुग्णांना लाभ द्यावा, अशी मागणी हाेत आहे. योजनेंतर्गत गरीब रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा दिला जातो. अनेक रुग्ण याेजनेपासून वंचित आहेत.
डाेणगावात अवैध गुटख्याची विक्री जोरात
डाेणगाव : परिसरात गत काही दिवसांपासून अवैध गुटखा विक्री जाेरात सुरू आहे. महामार्गावर असलेल्या डाेणगावात माेठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री हाेत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
जानेफळ : परिसरातील अनेक गावांमध्ये शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी हैराण झाला आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी जिवाची पर्वा न करता रात्री शेतात मुक्काम करीत आहेत. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
लाेणार येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
लाेणार : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी हाेत असल्याने नागरिक बेफिकीर होऊन वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिक फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, काेराेना संसर्ग वाढण्याची भीती आहे.
शेतकरी पीक विम्यापासून वंचित
अमडापूर : अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. शासनाने नुकसानभरपाई म्हणून मदत जाहीर केली होती. खरीप हंगामाच्या तोंडावर मागील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
स्वस्त धान्य दुकानात नियमांचे उल्लंघन
सिंदखेड राजा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानात नियमांचे उल्लंघन होत आहे. परिसरातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याची जादा दराने विक्री करण्यात येते. लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
बुलडाणा शहरात वाहतूक कोंडी
बुलडाणा : शहरातील मुख्य चाैकांमध्ये वाहतुकीची कोंडी हाेत आहे. परवाना नसलेल्या तसेच अल्पवयीन मुलांच्याही दुचाकी सुसाट धावतात. शहरातील बेलगाम वाहतुकीकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत आहे.