जुगार अड्ड्यावर धाड;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST2021-09-02T05:14:18+5:302021-09-02T05:14:18+5:30

राहेरी बु.: निमगाव वायाळ येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर किनगाव राजा पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी धाड टाकून पाच ...

Raids on gambling dens; | जुगार अड्ड्यावर धाड;

जुगार अड्ड्यावर धाड;

राहेरी बु.: निमगाव वायाळ येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर किनगाव राजा पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी धाड टाकून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच किनगाव राजा ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी जुगाराचा डाव सुरू असल्याचे दिसून आले. चंदू रामेश्वर नागरे (वय ३५), महादेव सुखदेव वायाळ (वय ४५), मधुकर लक्ष्मण हुसे (वय ४५) या आरोपीसह, शिवाजी विठोबा टेकाळे (वय ६०), श्रीराम शेषराव वायाळ (वय ५५) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये एकूण १४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपी विरोधात किनगाव राजा पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई ठाणेदार युवराज रबडे, श्रावण डोंगरे, सलीम परसुवला, राजू दराडे यांनी केली.

Web Title: Raids on gambling dens;