तीन जुगार अड्ड्यांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:32+5:302021-02-05T08:31:32+5:30
शहरात काही ठिकाणी वरली मटका व जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख ...

तीन जुगार अड्ड्यांवर धाड
शहरात काही ठिकाणी वरली मटका व जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली. त्यांनी तत्काळ तीन वेगवेगळे पथक तयार करत आपले सहकारी पोलीस हेड काँस्टेबल रामू गीते, सुरेश काळे, लेखनिक चंद्रशेखर मुरडकर, गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण, विठ्ठल चव्हाण, पोलीस काँस्टेबल राजकुमार कंकाळ, वाहतूक विभागाचे गजानन बनसोड, रवी चव्हाण यांना कारवाईसाठी पाठविले. यामध्ये अफजलखान शेर खान हा भाजी मंडीमध्ये वरली मटका लिहिताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून ८२० रुपये वरली मटकाचे साहित्य जप्त केले. त्याच्याच बाजूला भाजी मंडीमध्ये सुरज भुपतर याला वरली मटके आकडे चिठ्ठी लिहिताना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याच्या जवळून ७२० रुपये रोख व साहित्य जमा करण्यात आले. तिसरा आरोपी शेख तोफिक शेख हनीफ याला भागवत चित्रमंदिर परिसरातून वरली मटका आकडे देताना ताब्यात घेतले. त्याच्याजवळून ८५० रुपये रोख व इतर साहित्य जमा करण्यात आले. या तिन्ही कारवाईत एकूण २ हजार ३९० रुपये रोख व ७५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिन्ही आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.