दारू अड्ड्यावर छापा, दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST2021-09-17T04:41:18+5:302021-09-17T04:41:18+5:30

तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथे आरोपी शिवाजी बाजीराव म्हस्के हा ...

Raid on liquor den, charges filed against both | दारू अड्ड्यावर छापा, दोघांवर गुन्हा दाखल

दारू अड्ड्यावर छापा, दोघांवर गुन्हा दाखल

तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथे आरोपी शिवाजी बाजीराव म्हस्के हा गावामध्ये अवैध दारू विक्री करत असताना पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले असता त्याच्याजवळ अवैध दारूच्या एकूण सहा बाटल्या जप्त करण्यात आल्या. परंतु गावातील बाकी ठिकाणी असलेला दारू साठा लपविण्यात आरोपीला यश आले. याची फिर्याद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ रामसिंग राठोड यांनी दिली. त्यानुसार उपरोक्त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत १६ सप्टेंबर रोजी शहरातील देऊळगाव राजा जालना रोडवरील वाईन बारच्या जवळ गल्लीमध्ये आरोपी सतीश तुकाराम खुपसे हा या ठिकाणी अवैध दारू विक्री करत असताना पोलिसांनी झडप घालून पकडले असता त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या बाटल्यांचे ३२ नग जप्त करण्यात आले. घटनेची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप गुंजकर यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार उपरोक्त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid on liquor den, charges filed against both