शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

दारूबंदीसाठी राहुल बोंद्रे यांचा आक्रमक पवित्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:37 IST

चिखली : कोणत्याही गावात दारूबंदी लागू करण्यासाठी पार पडणाºया मतदान प्रक्रियेत बदल करण्यात येऊन ही मतदान प्रक्रिया महसूल विभागामार्फत घेण्यात यावी, मागणीसाठी विधानसभेत आमदार राहुल बोंद्रें यांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांसमोरील विंगमध्ये उतरल्याने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे.

ठळक मुद्देदारूबंदीसाठीची मतदान प्रक्रि येतील बदलासाठी विंगमध्ये उतरले

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : कोणत्याही गावात दारूबंदी लागू करण्यासाठी पार पडणाºया मतदान प्रक्रियेत बदल करण्यात येऊन ही मतदान प्रक्रिया महसूल विभागामार्फत घेण्यात यावी, मागणीसाठी विधानसभेत आमदार राहुल बोंद्रें यांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांसमोरील विंगमध्ये उतरल्याने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे.विधानसभेच्या कामकाजादरम्यान दारूबंदीबाबत आमदार डॉ.अनिल बोडे यांनी लक्षवेधी दाखल केली होती़  या चर्चेत सहभागी होताना देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी गावातील एकंदरीत महिलांचे ५० टक्के मतदान दारूबंदीच्या बाजूने व्हावे लागते़  तरच दारू दुकान हटविण्याचा निर्णय घेतला जातो; मात्र ही अटच मुळात लोकशाहीविरोधी असून, दारूबंदीसाठी झगडणाºया महिलांची गळचेपी करणारी आहे़  तसेच दारूचे दुकान हटविण्यासाठी होणारी मतदान प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क या विभागाकडून होते. त्यांच्याकडून ही प्रक्रिया काढून घेत ती महसूल विभागावर सोपविण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार राहुल बोंद्रे यांनी आज सभागृहात आक्रमकपणे लावून धरली़  दरम्यान, दारूच्या दुकानासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे रद्द करावे व इतर मागण्यांबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आ.बोंद्रे अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन तेथे त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला.़ त्यामुळे येत्या तीन महिन्यांत सदर निर्णय बदलण्यासंदर्भात घोषणा करण्याचे आश्वासन ना. बावनकुळे यांनी दिले आहे. 

अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करा!तालुक्यातील इसरूळ येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व त्यांचे श्रद्धास्थान असलेले भांगिर बाबाचे मंदिर हटविण्याच्या कार्यवाहीची न्यायालयीन चौकशी व्हावी व या प्रकरणात दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात येऊन पुतळा त्याच जागेवर बसविण्यात यावा, अशी मागणी आमदार राहुल बोंद्रे व आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे़ 

शहर पाणी पुरवठा योजनेबाबत लवकरच बैठक चिखली शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी याबाबत तातडीने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी आग्रही भूमिका विधानसभेत आ. राहुल बोंदे्र यांनी मांडली असता पाणी पुरवठा राज्यमंत्री ना. रणजित पाटील यांनी तातडीने बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे सभागृहात जाहीर केले आहे. 

टॅग्स :Rahul Bondreराहुल बोंद्रेChikhliचिखली