शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बुलडाणा जिल्ह्यात रब्बी बियाण्यांचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:42 PM

Buldhana News, Agriculture Sector आगामी काळात बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.        

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : रब्बी हंगामात पेरणीसाठी जिल्ह्याला प्रस्तावित क्षेत्रानुसार ९८,३४४ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून, सध्या २० हजार ७८५ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. सध्या रब्बी पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.         जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिकासाठी ६६५०३ हेक्टरचे नियोजन करण्यात आले असून, त्याकरिता ४६५०० क्विंटल बियाणे लागणार आहे. जिल्ह्यात सध्या २६९९ क्विंटल बियाणेच उपलब्ध आहेत. तसेच हरभरा पिकासाठी ६१२४२ हेक्टर क्षेत नियोजित असून, ४९७२१ क्विंटल बियाणे लागणार आहे. सध्या १७१९६ क्विंटल बियाणेच उपलब्ध आहेत. मकासाठी १७४५० हेक्टर क्षेत्र नियोजित असून, १४४० क्चिंटल बियाणे लागणार आहे, तर सध्या ४५० क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. ज्वारीसाठी ११४४९ हेक्टरवर पेरणीकरिता ६७८ क्विंटल बियाणे लागणार असून, १९७ क्विंटल उपलब्ध आहेत. करडीची ३१३ हेक्टर, सूर्यफूल १७६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे. त्याकरिता ९८३४४ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. सध्या जिल्ह्यात २०७८५ क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. सध्या रब्बीची पेरणी सुरू झाली आहे.  यावर्षी परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी त्याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. यावर्षी जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी ३० ते ४० हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी बुलडाणा, सिंदखेड राजा, चिखली, देऊळगाव राजा, मलकापूर, संग्रामपूर व नांदुरा या तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. आगामी काळात मागणी वाढल्यानंतर बियाणे उपलब्ध करण्यात येईल, तसेच अनेक शेतकरी घरगुती बियाण्यांचाही वापर करणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक नाईक यांनी सांगितले.  

आवश्यक बियाण्यांच्या ४० टक्केच मागणी असते. उर्वरित ६० टक्के बियाणे शेतकरी स्वत:जवळील वापरतात. सध्या ६० टक्के बियाणे पुरवठा आहे; मात्र त्यापैकी केवळ १५ टक्के विक्री आहे. प्रत्यक्ष हंगाम आता सुरू होत आहे.- नरेंद्र नाईक जिल्हा कृषी अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावagricultureशेती