अपु-या पावसामुळे रब्बी हंगाम धोक्यात
By Admin | Updated: November 8, 2014 23:53 IST2014-11-08T23:37:15+5:302014-11-08T23:53:32+5:30
खामगाव तालुक्यातील परिस्थिती, शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण.
_ns.jpg)
अपु-या पावसामुळे रब्बी हंगाम धोक्यात
खामगाव (बुलडाणा) : निसर्गाच्या अवकृपेने सद्यस्थितीत तालुक्यातील जलाशय पातळी कमालीची घसरली आहे. तर विहिरींची पाणी पातळी हिवाळ्यातच धीर सोडू पाहत असल्याने यंदाचा रब्बी हंगाम पूर्णत: धोक्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
खामगाव तालुक्यात मन, तोरणा, ज्ञानगंगा, ढोरपगाव व मस या प्रकल्पाबरोबरच इतर लघु प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. यंदा पावसाळ्याअखेर ४५२.७ मी.मी. पावसाची नोंद स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतली आहे.
अपुर्या पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला; परंतु रब्बी हंगामात खरिपातील आर्थिक तूट भरुन काढण्याची संधीही निसर्गाने हिसकावून घेतली.
त्यामुळे आगामी काळात रब्बीचे गहू, हरभरा व कांदा पीक घेणे धोक्यात आले आहे. गतवर्षी १00 टक्के पावसाळा झाल्याने सर्वत्र रब्बी व उन्हाळी हंगाम बहरात होता. गहू, हरभरा, भूईमूग व कांदा पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाले होते; मात्र यावर्षी परिस्थितीने शेतकर्यांना आर्थिक संकटात टाकले आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दगा दिला. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली. खरिपाच्या पिकांना लागलेला खर्चही झालेल्या उत्पादनातून निघालेला नसल्याने शेतकरी पार खचला आहे. खरिपाबरोबरच यावर्षी रब्बीचीही हीच अवस्था आहे.
प्रकल्पाचे नाव जलाशय क्षमता सध्याचा जलसाठा टक्केवारी
मन ३८.८३ दलघमी १९.0२ दलघमी ५३
तोरणा ७.९0 दलघमी १.९१ दलघमी २0
ढोरपगाव ५.८३ दलघमी ३.८३ दलघमी ७८
ज्ञानगंगा ३३.९३ दलघमी २२.0४ दलघमी ७0
मस १५.0४ दलघमी १३.६४ दलघमी ९१