रब्बीचा हंगाम अर्धा संपला; तरी सिंचनासाठी पाणी मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 02:54 PM2020-01-06T14:54:48+5:302020-01-06T14:54:59+5:30

पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन न झाल्याने जिल्हयातील लाखो हेक्टरवरील पिके कोमजण्याच्या मार्गावर आहेत.

The rabbi season is over in half; However, there is no water for irrigation! | रब्बीचा हंगाम अर्धा संपला; तरी सिंचनासाठी पाणी मिळेना!

रब्बीचा हंगाम अर्धा संपला; तरी सिंचनासाठी पाणी मिळेना!

Next

योगेश फरपट 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: रब्बीचा हंगाम अर्धा संपला तरी जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना अद्याप सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात पाऊस झाल्याने खरिपाची पीके हातातून गेली. जिल्ह्यात खडकपूर्णा, नळगंगा, मन, पेनटाकळी, मस, तोरणा, ज्ञानगंगा, गोराळा असे सिंचन प्रकल्प प्रामुख्याने आहेत. गत दोन वर्षापासून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. असे असतानाही सिंचन विभागातर्फे कोणतेही नियोजन यावर्षी करण्यात न आल्याने शेतकºयांना रब्बीसाठी पाणी मिळाले नसल्याची दुर्दैव आहे. राजकारणात व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींना याचे सोयरसुतक उरले नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जिल्हयातील बहुतांश प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. पाणीही आरक्षीत आहे. मात्र पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन न झाल्याने जिल्हयातील लाखो हेक्टरवरील पिके कोमजण्याच्या मार्गावर आहेत. मात्र कालव्याची दुरुस्ती अद्याप होवू न शकल्याने पाणी सोडण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

पाणी वापर संस्थांचे कुणी ऐकेना!
शेतकºयांना सिंचनासाठी जास्तीत जास्त नियोजनबद्ध पाणी मिळावे यासाठी पाणी वापर संस्था कार्यान्वीत करण्यात आल्या. मात्र पाणी वापर संस्थांचाही आवाज प्रशासनाकडून दाबण्यात आल्याचे दिसून येते. कुणी काही ऐकून घ्यायला तयार नाही. शेतकºयांच्या रोषाचा सामना पाणी वापर संस्थांना करावा लागत आहे.
१५ डिसेंबरच्या आश्वासनाचे काय झाले?
मागणीनुसार १५ डिसेंबरपर्यंत सिंचन प्रकल्पातून कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले होते. मात्र ५ जानेवारी आली तरी अद्याप पाणी मिळाले नसल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


शेतकºयांची गरज लक्षात घेवून पाणीही आरक्षीत करण्यात आले. मात्र काही ठिकाणी शेतकºयांनी पाट फोडून ठेवले आहेत. त्यात कालव्याच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे थोडा उशिर झाला.
- अनिल कन्ना अभियंता, जलसंपदा विभाग, बुलडाणा

 

 

Web Title: The rabbi season is over in half; However, there is no water for irrigation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.