रा. काँ. तालुका कला व सांस्कृतिक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी नासिर शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:10+5:302021-08-25T04:39:10+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या शिफारशीवरून, ...

Ra. Where Nasir Sheikh as Taluka President of Taluka Arts and Cultural Department | रा. काँ. तालुका कला व सांस्कृतिक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी नासिर शेख

रा. काँ. तालुका कला व सांस्कृतिक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी नासिर शेख

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या शिफारशीवरून, चित्रपट विभाग विदर्भ प्रांत अध्यक्ष अभिनेत्री वैशाली माडे, विदर्भ उपाध्यक्ष अभिनेते बंडू अंबुस्कर, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष अभिनेते संजय सोळंके, बुलडाणा जिल्हा अध्यक्ष अभिनेते सुनील बोरकर यांनी नासेर शेख यांची निवड केली. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शेख ईरफान अली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, माजी पंचायत समिती सभापती विलासराव देशमुख, शिवाजीराजे जाधव, जगनमामा सहाणे, सतीश काळे, महेश पवार, राजूअप्पा बोंद्रे, श्याम मेहेत्रे. ॲड. संदीप मेहेत्रे,राजेंद्र अंभोरे, ॲड. आरेफखान पठाण, संजय सोळंके, शिवाजी गुंजाळ, सखाराम बरांडे, अशोक झोरे, विष्णू मगर, यासीन शेख रधाजी मेहत्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Ra. Where Nasir Sheikh as Taluka President of Taluka Arts and Cultural Department