आर. बी. मालपाणी विवेकानंद आश्रमाचे नवे अध्यक्ष
By Admin | Updated: April 8, 2017 00:11 IST2017-04-08T00:11:08+5:302017-04-08T00:11:08+5:30
हिवरा आश्रम : निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज यांनी संस्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमाच्या अध्यक्षपदी भगवद्गीतेचे चिंतनकार आर.बी. मालपाणी यांची निवड करण्यात आली आहे.

आर. बी. मालपाणी विवेकानंद आश्रमाचे नवे अध्यक्ष
हिवरा आश्रम : निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज यांनी संस्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमाच्या अध्यक्षपदी भगवद्गीतेचे चिंतनकार, शिक्षणतज्ज्ञ आणि शिस्तप्रिय संन्यासी आर.बी. मालपाणी यांची निवड करण्यात आली आहे.
विवेकानंद आश्रमाच्या कार्यकारी विश्वस्त मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली. शुकदास महाराजांचे कार्य पुढे नेण्यासाठी विश्वस्त मंडळ कटिबद्ध असल्याचा ठरावही या बैठकीत घेण्यात आला.
शुकदास महाराज यांनी स्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमाद्वारे शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय, सेवा यांसह विविध संस्था व उपक्रम राबविले जातात. महाराजांच्या कल्पनेतून साकार झालेले अनेक उपक्रम सध्या मूर्तावस्थेत आहेत.