कोरम आभावी देऊळघाट सरपंचपदाची सभा तहकुब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:36+5:302021-03-04T05:05:36+5:30

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष देऊळघाट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे लागून होते.१ सदस्य अविरोध निवडून आल्याने १५ जानेवारीला १७ पैकी १६ सदस्यांसाठी ...

Quorum Abhavi Deulghat Sarpanchpada Sabha Tahkub | कोरम आभावी देऊळघाट सरपंचपदाची सभा तहकुब

कोरम आभावी देऊळघाट सरपंचपदाची सभा तहकुब

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष देऊळघाट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे लागून होते.१ सदस्य अविरोध निवडून आल्याने १५ जानेवारीला १७ पैकी १६ सदस्यांसाठी निवडणूक पार पडलीण त्यानंतर१८ जानेवारीला निकाल घोषित करण्यात आले.काँग्रेस पृस्कृत ग्रामविकास पॅनलचे ९ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सामाजिक एकता पॅनलचे ८ सदस्य निवडून आले.सरपंचपद एससी महिला साठी राखीव निघाले.सरपंच पदाची निवडणूक ९ फेब्रूवारीला घेण्यात आलीण मात्र एका ही एससी माहिला सदस्याने अर्ज दाखल न केल्याने जिल्हाधिकारी यांनी महिला आरक्षण हटवून सरपंचपद एससी प्रवर्गासाठी आरक्षित करत २६ फेब्रूवारीला सरपंच पदाची निवडणूक घोषित केली. परंतु वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही निवडणूक स्थगित करुण जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ३ मार्च रोजी घेण्यात आली. ग्रामविकास पॅनलकडून परवीन बी जावेद खान तर सामाजिक एकता पैनल कडून रूपचंद रामचंद पसरटे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. दुपारी २.३० वाजता निवडणूक हाेणे अपेक्षित होते. त्यानुसार फक्त ८ सदस्य ग्रामपंचायत भवनमध्ये पोहोचले व ९ सदस्य गैरहजर राहिल्याने कोरम पूर्ण झाला नाही. त्यामुळे आजची ही सभा रद्द झाली असून नियमाप्रमाणे ४ मार्च रोजी घेण्यात येणार आहे,अशी माहिती बुलडाणा तहसीलदार रूपेश खंडारे यांनी दिली.

Web Title: Quorum Abhavi Deulghat Sarpanchpada Sabha Tahkub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.