शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST

बुलडाणा : चिखली तालुक्यातील आमखेड येथील माती तलाव फुटल्यामुळे चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यातील लगतच्या भागातील शेतीचे मोठे ...

बुलडाणा : चिखली तालुक्यातील आमखेड येथील माती तलाव फुटल्यामुळे चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यातील लगतच्या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत असलेल्या जलसंधारणाच्या ८६९ स्ट्रक्चरपैकी तब्बल १८८ स्ट्रक्चरची कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

आमखेड येथील दुर्घटनेनंतर यासंदर्भात माहिती घेतली असता, जलसंधारण विभागाकडे (लोकल सेक्टर) १७ फेब्रुवारी २०२१ च्या राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार ही दुरुस्तीची कामे सोपविण्यात आली होती. मात्र अद्यापही या कामांना मुहूर्त निघालेला नाही. पावसाळ्यामुळे आता ही कामे दिवाळीनंतरच होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. दुसरीकडे या १८८ स्ट्रक्चरपैकी ६२ स्ट्रक्चरची कामे करण्यास पूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु त्यासंदर्भातील निविदा झालेल्या नव्हत्या. आता या दुर्घटनेनंतर सुमारे आठ कोटी ५० लाख रुपयांच्या या कामांच्या निविदा काढण्यात येत असल्याचे जलसंधारण विभागाचे अधिकारी राजू झोरावत यांनी सांगितले. दरम्यान, आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही ते म्हणाले.

--जि.प. सिंचन विभागाचा डोलारा मोठा--

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे ७५ सिंचन तलाव, ३४५ पाझर तलाव, १९८ गाव तलाव आणि २०१ कोल्हापुरी बंधाऱ्याचे व्यवस्थापन आहे. या माध्यमातून १९ हजार ५०० हेक्टरच्या आसपास या विभागाची महत्तम सिंचन क्षमता आहे. मात्र बहुतांश स्ट्रक्चर हे जुने झालेले आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीचीही गरज निर्माण झालेली आहे.

-आमखेडचा माती तलाव जुना-

जिल्हा परिषदेंतर्गतचा आमखेडचा माती तलाव हा १९८० च्या दशकातला आहे. तो २८ जूनरोजी झालेल्या दमदार पावसादरम्यान फुटल्याने या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले. परिसरातील अेाढ्यांनाही या काळात पूर आल्याने हे पाणी नदी-नाल्यात सामावू शकले नाही व शेतीमध्ये ते घुसल्याने मोठे नुकसान झाले. दुसरीकडे आमखेडनजीकच असलेला अंबाशी येथील तलाव मात्र सुरक्षित असल्याचे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे अभियंता पवन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पाहणी केली आहे.

--६२ कामे हस्तांतरीत--

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडील ६२ कामे आमच्याकडे हस्तांतरित झालेली आहेत. या कामांची निविदा सध्या काढण्यात येत आहे. आमखेड येथील फुटलेला माती तलावाचा या कामामध्ये समावेश नसल्याचे जलसंधारण अधिकारी वैभव शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.