अवैध रेतीचे उत्खनन जोमात
By Admin | Updated: November 22, 2014 23:53 IST2014-11-22T23:53:35+5:302014-11-22T23:53:35+5:30
मेहकर तालुक्यात पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेतीची तस्करी.

अवैध रेतीचे उत्खनन जोमात
मेहकर (बुलडाणा) : तालुक्यात अवैध रेतीचे उत्खनन जोमात सुरू आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने रेती माफियांना अभय निर्माण झाले आहे.
तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेतीची तस्करी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान हो त आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातून एकमेव खडकपूर्णा नदी वाहते. या नदीमध्ये पाच ते २५ फूट खोल रेतीसाठा आहे; परंतु महसूल खा त्याचे काही अधिकारी मलिदा गोळा करण्यात व्यस्त असल्याने पैनगंगासह खडकपूर्णा नदीपात्रातूनही अवैध रेती उत्खननाला पेव फुटले आहे. रेती ठेकेदारांवर राजकीय कृपाछत्र असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात रेतीची तस्करी वाढली असून, खुलेआम अवैध रेतीची वाहतूक केली जात होती. यामुळे शासनाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होते आहे. रात्रीच्यावेळी अवैध रेतीची तस्करी करण्याकरि ता विना नंबर प्लेट वाहनाचा उपयोग रेती माफिया करीत आहेत. या प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. रात्रीची रेती चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. महसूल विभागाने रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी गत काही महिन्यांपूर्वी रेती माफियांवर पाळत ठेवून वाहनधारकावर कारवाई केली होती; परंतु त्यानंतर अवैध रेती वाह तुकीकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा अवैधरीत्या रेतीचे उत्खनन जोमात सुरू झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेती वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. दिवसाच्या सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेव्यतिरिक्त नदीपात्रात दोन मीटरपेक्षा जास्त वाळू उपसा करण्यास मनाई असतानाही, तसे न होता येथे सर्रास नियमाला मूठमाती दिल्या जात आहे.