खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प
By Admin | Updated: October 22, 2015 01:45 IST2015-10-22T01:45:36+5:302015-10-22T01:45:36+5:30
मोताळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात इंटरनेट सेवा बंद.

खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प
धामणगाव बढे (जि. बुलडाणा): मोताळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार मागील आठ दिवसांपासून ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी तथा नागरिक खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने अडचणीत सापडले आहेत. मागील आठ दिवसांपासून सदर कार्यालयातील बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद आहे व खरेदी-विक्रीचे व्यवहाराची प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे व्यवहारही बंद आहेत, तर इतर कंपन्यांची इंटरनेटसेवा वापरण्याची काळजी या कार्यालयाने घेतलेली नाही. यासंदर्भात कार्यालयात विचारणा केली असता तेथील अधिकारी रजेवर होते. दरम्यान, इंटरनेटसेवा तातडीने सुरू करण्याची मागणी किशोर मोदे, दिनकर बढे, उपसरपंच अफसर यांनी संबंधितांकडे केली आहे.