बुलडाणा पालिकेचा दंडात्मक कारवाईचा धडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:05 IST2021-02-21T05:05:38+5:302021-02-21T05:05:38+5:30
पाचही पथकांना त्यांचा परिसर ठरवून दिलेला आहे. पहिले पथक मलकापूर रोड, डॉल्फिन स्विमिंग पूल ते जयस्तंभ चौक, स्टेट बँक ...

बुलडाणा पालिकेचा दंडात्मक कारवाईचा धडका
पाचही पथकांना त्यांचा परिसर ठरवून दिलेला आहे. पहिले पथक मलकापूर रोड, डॉल्फिन स्विमिंग पूल ते जयस्तंभ चौक, स्टेट बँक मुख्यालय, दुसऱ्याकडे जांभरून रोड, बस स्टँड परिसर ते संगम चौक, तिसऱ्या पथकाकडे चिखली रोड, बोथा खामगाव रोड , त्रिशरण चौक, चौथ्या पथकाकडे चिंचोले चौक, धाड रोड, नाका ते सर्क्युलर रोड आणि अतिक्रमण पथकाकडे जनता चौक, बाजारपेठ, मार्केट लाईन ते कारंजा चौक असा भाग देण्यात आला आहे. प्रसाशन अधिकारी संजय जाधव व एकनाथ गोरे यांच्यावर या पथकांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
-- साडेसात लाखांचा दंड वसूल--
बुलडाणा शहरात गेल्या वर्षभरापासून आजपर्यंत बुलडाणा पालिकेने सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात मास्क न लावल्याप्रकरणी २ लाख ९ हजार रुपये, वेळेनंतर दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी एक लाख रुपये, रस्त्यावर तथा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी १ लाख ५७ हजार रुपये, शारीरिक अंतराचे पालन न केल्या प्रकरणी १ लाख २६ हजार आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख ५३ हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे.