शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्यातील दोन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 16:17 IST

जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 38 जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानदेखील शहीद झाले आहेत. मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह दीक्षित (राजपूत) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड हे दोन जवान शहीद झाले आहेत.

बुलडाणा - जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यातशहीद झालेल्या 38 जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानदेखील शहीद झाले आहेत. मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह दीक्षित (राजपूत) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड हे दोन जवान शहीद झाले आहेत. हे दोघंही 10 फेब्रुवारीला सुटी संपल्यानंतर कर्तव्यावर रूजू झाले होते. 46 वर्षीय संजयसिंह भिकमसिंह दीक्षित यांचे शिक्षण हे मलकापूर शहरातच झाले आहे. 1996 मध्ये ते सीआरपीएफध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई जिजाबाई, पत्नी सुष्मा, मुले जयसिंह आणि शुभमसिंह असा परिवार आहे. त्यांची पत्नी सध्या नागपूर येथील सीआरपीएफच्या कॉर्टरमध्ये राहत असल्याची माहिती आहे. नातेवाईक त्यांना आणण्यासाठी नागपूरला रवाना झाले असल्याचेही काही निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावानजीक असलेल्या गोवर्धन नगर येथील नितीन शिाजी राठोड (३६) हे देखील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ते शहीद झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे.

 

दरम्यान, मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह दीक्षित यांचे पार्थिव 15 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता दिल्ली येथून विमानाने नागपूर येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर तेथून ते मलकापू येथे आणण्या येईल. मलकापूर येथे 16 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.यासंदर्भात अद्याप जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. लोणार तहसीलदार गोवर्धन नगरमध्ये लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावानजीक असलेल्या गोवर्धन नगर येथील शहीद जवान नितीन शिवाजी राठोड यांच्या निवासस्थानी लोणारचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव 16 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजेच्या सुमारास गोवर्धन नगरमध्ये आणण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. प्रसंगी त्यात काहीसा बदलही होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर