रेखाताई खेडेकरांच्या जीवनप्रसावर आधारीत 'जनरेखा' गौरवग्रंथाचे प्रकाशान सोमवारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:32 AM2021-04-12T04:32:46+5:302021-04-12T04:32:46+5:30

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर ऑनलाईन पध्दतीने पार पडणाऱ्या या गौरवगंथाच्या प्रकाशन सोहळ्यास आमदार श्वेता महाले, आमदार संजय कुटे, संजय रायमुलकर, आकाश ...

Publication of 'Janrekha' Gaurav Granth based on Rekhatai Khedekar's life on Monday! | रेखाताई खेडेकरांच्या जीवनप्रसावर आधारीत 'जनरेखा' गौरवग्रंथाचे प्रकाशान सोमवारी !

रेखाताई खेडेकरांच्या जीवनप्रसावर आधारीत 'जनरेखा' गौरवग्रंथाचे प्रकाशान सोमवारी !

Next

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर ऑनलाईन पध्दतीने पार पडणाऱ्या या गौरवगंथाच्या प्रकाशन सोहळ्यास आमदार श्वेता महाले, आमदार संजय कुटे, संजय रायमुलकर, आकाश फुंडकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, जि.प.अध्यक्षा मनिषा पवार, चिखलीच्या नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, माजी आमदार बाबुराव पाटील, भारत बोंद्रे, राहुल बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सुमारे चारशे पानांच्या 'जनरेखा' या या गौरव ग्रंथात रेखाताई खेडेकर यांच्या १५ वर्षांच्या आमदारकी, त्यांचे मराठा सेवा संघात योगदान, कुटुंब आणि नातेवाईक यांच्या सुखदु:खात पार पाडलेली जबाबदारी, एक सुसंस्कृत व खंबीर पत्नी म्हणून अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकरांना दिलेली खंबीर साथ या व इतर बाबतीतली सर्व माहितीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या गौरवग्रंथात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांचे शुभेच्छा संदेशही प्रकाशित करण्यात आले आहेत. गौरवग्रंथ आणि उपरोक्त कार्यक्रमासाठी पांडुरंग खेडेकर, पंडितराव देशमुख, सौरभ खेडेकर, कपिल खेडेकर, बाळासाहेब ठाकरे आदींनी मेहनत घेतली आहे. (वा. प्र.)

फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने सहभागी व्हा !

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चिखली येथून जनरेखा गौरवग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे आयोजित करण्यात आला आहे. यापृष्ठभूमीवर कोणीही प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाईन पध्दतीने असाल तेथून सहभागी व्हावे, प्रत्यक्ष भेट व उपस्थिती टाळावी, असे आवाहन जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव कोल्हे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विनोद बोरे यांच्यासह रेखाताई खेडेकर एकसष्ठी सत्कार व गौरवग्रंथ प्रकाशन समितीने केले आहे.

Web Title: Publication of 'Janrekha' Gaurav Granth based on Rekhatai Khedekar's life on Monday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.