नागरिकांची कामे खोळंबली
By Admin | Updated: August 5, 2014 22:20 IST2014-08-05T22:20:50+5:302014-08-05T22:20:50+5:30
संपाचा परिणाम: तहसिलमध्ये शुकशुकाट

नागरिकांची कामे खोळंबली
बुलडाणा : तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने बेमुदत संपाचे शस्त्र उगारले. सर्व तहसिलदार आजपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे स्थानिक तहसिल कार्यालयात आज सकाळपासून शुकशुकाट होता. असे यामुळे विविध कामे खोळंबल्याने नारिकांना त्रास सहन करावा लागता. विविध प्रमाणपत्रे, संजयगांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, उत्पन्नाचे दाखले, रहीवासी प्रमाणपत्रे, रोजगार हमी योजना, रेशनकार्ड, महसूल, निवडणूक, जात प्रमाणपत्र आदीची काम स्थानिक तहसिल कार्यालयातून नियमित केली जाते. मात्र तहसिलदार आणि नायबतहसिलदार संघटनेने पुकारलेल्या संपाचा परिणाम तहसिल कार्यालयाच्या कामकाजावर आज दिसून आला. दररोज विविध कामांसाठी कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी असते. ह्यमहसूल कर्मचारी संघटनेचा संप असल्याची जनतेनी नोंद घ्यावीह्ण असे सुचनाफलक तहसिलच्या भिंतीवर लावण्यात आले. सर्व अधिकारी व कर्मचारी संपावर असल्यामुळे आज नागरिकांना काम न होता तहसिलमधून परत जावे लागते. यामुळे तहसिल कार्यालयात शुकशुकाट होता.