जाहीर सभांच्या मैदानावर येणार बंदी
By Admin | Updated: September 21, 2014 00:39 IST2014-09-20T23:34:20+5:302014-09-21T00:39:00+5:30
निवडुक आयोगाचे निर्बंध; बुलडाणा शहरात केवळ चार मैदानच.

जाहीर सभांच्या मैदानावर येणार बंदी
बुलडाणा : प्रचार काळात नेत्यांच्या जाहीर सभेसाठी लागणार्या मैदानाच्या बुकिंगवर आता निवडणूक आयोगाने निर्बंध घातले असून, सभेच्या ४८ तासांच्या आधी उमेदवारांना मैदानाचे बुकिंग करावे लागणार आहे.
निवडणूक प्रचार काळात प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांविरुद्ध अगदी खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप करतात. एकमेकांचा प्रचार उधळून लावणे, प्रचाराच्या सभा हाणून पाडणे तर बरेच वेळा एखाद्या मोठय़ा नेत्याची जाहीर सभाच होऊ नये यासाठी जाहीर सभेचे मैदान मुद्दाम आरक्षित करून ठेवणे असेही प्रकार घडतात. त्यामुळे दुसर्या उमेदवाराला निर्भय वातावरणात प्रचार करता येत नाही. त्यांच्या अधिकारवर गदा येते. असे प्रकार घडल्याचे निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्यानंतर या निवडणुकीपासून आता जाहीर सभेसाठी मैदान आरक्षित करताना उमेदवाराची मनमानी चालणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने घेताला आहे.