बुलडाणा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करा- सदाभाऊ खोत

By Admin | Updated: April 18, 2017 00:47 IST2017-04-18T00:47:43+5:302017-04-18T00:47:43+5:30

बुलडाणा- शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, असे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी दिले.

Provide clean water to Buldana City - Sadabhau Khot | बुलडाणा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करा- सदाभाऊ खोत

बुलडाणा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करा- सदाभाऊ खोत

बुलडाणा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणाजवळील फिल्टर प्लाण्टमधील रोटर नादुरूस्त असल्यामुळे शहराला शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नाही. या पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील रोटर त्वरित बदलविण्यात यावे, तसेच शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, असे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी दिले.
येळगाव जलाशयाजवळील पाणी शुद्धीकरण यंत्र बंद असल्याबाबत काही नागरिकांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री यांना निवेदन दिले. मंत्र्यांनी तत्काळ या निवेदनाची दखल घेत दौऱ्यादरम्यान या जलाशयाजवळील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. याप्रसंगी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा शाखेचे अभियंता यांना कडक शब्दात सूचना देताना राज्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, नगरपालिकेचे पाणीपुरवठा शाखेचे राजेश गायकवाड व अन्य अधिकारी उपस्थित होते. शुद्ध पाणीपुरवठा करून शहरवासीयांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन करीत राज्यमंत्री खोत म्हणाले की, जलाशयामध्ये पाणी असताना शुद्ध व मुबलक पाण्याचा पुरवठा करावा. रोटरमध्ये अडकलेला गाळ पूर्ण काढून घेण्यात यावा. या गाळामुळे पाणी शुद्धीकरण व्यवस्थित होत नाही, तरी याबाबत सर्व काळजी नगरपालिकेने घ्यावी. या रोटरचे त्वरित अंदाजपत्रक सादर करून रोटर बसवून घेण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Provide clean water to Buldana City - Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.