वीर पित्यास शासकीय अनुदानाचा धनादेश प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:19+5:302021-08-24T04:39:19+5:30

रक्षाबंधननिमित्ताने आ. श्वेता महाले यांनी वीर पिता भारत पावर यांना राखी बांधून मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान, शहीद ...

Provide a check for government grant to Veer Pita | वीर पित्यास शासकीय अनुदानाचा धनादेश प्रदान

वीर पित्यास शासकीय अनुदानाचा धनादेश प्रदान

रक्षाबंधननिमित्ताने आ. श्वेता महाले यांनी वीर पिता भारत पावर यांना राखी बांधून मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान, शहीद जवान कैलास पवार यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी शासकीय आर्थिक व इतर मदत तातडीने मिळावी, शहीदाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी व इतर कोणत्याही अडचणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी आ.महाले यांनी दिले, तसेच शहीदाच्या कुटुंबाला लवकर मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनादेखील आ.महाले यांनी उपस्थित सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना यावेळी दिल्या. यावेळी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्करराव पडघान, भाजपाचे न.प.गटनेते प्रा.डॉ.राजू गवई, सुभाषअप्पा झगडे, अंकुशराव पाटील, पंजाबराव धनवे, संजय त्र्यंबक पवार, मंदाबाई गवई, प्रकाश गवई, सदाशिव म्हस्के, श्याम वाकदकर, सुधीर तांबट, परवेज जामदार आदी उपस्थित होते.

Web Title: Provide a check for government grant to Veer Pita