युवा राष्ट्रवादीचे जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन
By Admin | Updated: December 12, 2014 00:41 IST2014-12-12T00:41:51+5:302014-12-12T00:41:51+5:30
शेतक-यांसाठी संपुर्ण कर्जमाफीची मागणी.
युवा राष्ट्रवादीचे जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन
बुलडाणा : शेतकर्यांना कर्ज माफी देवून त्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, कोरडवाहू शेती करणार्या शेतकर्यांना हेक्टरी पंचवीस हजार तर ओलीतीसाठी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी, आत्मह त्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला दहा लाख रुपये मदत जाहिर करण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर धरणे आंदोलन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये गतवर्षी अतवृष्टीमुळे खरिप पीकाचे तर गारपिटीमुळे रब्बी पीकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर यावर्षी अत्यल्प पाऊस व परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे सोयाबीन व कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्पन्नातून शेतकर्यांचा उत्पादन खर्च सुध्दा निघाला नाही. रब्बी क्षेत्रातही कमालीची घट आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून शेतकर्यांना संपुर्ण कर्ज माफी देण्याची मागणी करण्यात आल्या आहेत. सदर मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.