पॅलेस्टाईनवरील हल्ल्याविरोधात खामगावात निषेध मोर्चा

By Admin | Updated: July 19, 2014 00:54 IST2014-07-19T00:25:40+5:302014-07-19T00:54:25+5:30

पॅलेस्टाईनवर इस्त्राईल कडून वारंवार होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाज बांधवांचा मोर्चा.

The protest against Khalgawa protest against Palestine attacks | पॅलेस्टाईनवरील हल्ल्याविरोधात खामगावात निषेध मोर्चा

पॅलेस्टाईनवरील हल्ल्याविरोधात खामगावात निषेध मोर्चा

खामगाव : पॅलेस्टाईनवर इस्त्राईल कडून वारंवार होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास निषेध मोर्चा काढण्यात आला
मोर्चेकर्‍यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, पॅलेस्टाईन वर इस्त्राईल कडुन वारंवार हल्ले होत आहे. या हल्यात अनेक निष्पापांचा नाहक वळी जात आहे. याकरिता भारताने गाजा पट्टीवरील हल्ले थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. इस्त्राईल पॅलेस्टाईन देशात गैरकायदेशीर घुसुन ताबा करण्याचा प्रयत्न करीत आहे. पॅलेस्टाईन भारताचा जुना सोबती असून इस्त्राईलचे सैन्य कार्यवाईचा निषेध करण्यात आला. तसेच पंतप्रधानांनी आपल्या मित्र देशासोबत चर्चा करुन पॅलेस्टाईनला योग्य ती मदत करावी. या व इतर मागण्याकरीता मुस्लिम बांधवाच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये डॉ.वकार उल हक खान, वसीम नवेद, हाजी बुढन खान, शोहरत खान, मो,आरिफ पहेलवान, हाफीज अजमतउल्लाखान, हाफीज खलील , मौलाना अनीस , मौलाना वकारसाहब, हाफीज अनिस , हाफिज अस्लम , मौलाना शब्बीर , हाफीज अलीम , हाफीज शकील , हाफीज सरफराज यांच्या सह इतर मुस्लिम समाज बांधवाच्या सहभागी झाले होते.

Web Title: The protest against Khalgawa protest against Palestine attacks