शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई निवारणाची दहा लाख रुपयापर्यंतची कामे ग्रामपंचायतींना देण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:06 IST

या कामांना गती  देता येईल असा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव तथा बुलडाण्याचे पालक सचिव श्यामलाल गोयल यांना देण्यात आला आहे.

बुलडाणा : तीन लाखांपेक्षा अधिक खर्च मर्यादेची पाणीटंचाई निवारणाच्या कामासाठी कराव्या लागणाºया ई-निविदेमुळे मोठ्या प्रमाणावर कालापव्य होऊन टंचाईची कामे प्रलंबीत राहत आहेत. त्यामुळे तात्पुरती पुरक नळ योजना व तत्सम दहा लाख रुपयापर्यंतची टंचाईची कामे थेट ग्रामपंचायतींमार्फत केल्यास  कालापव्य टळून या कामांना गती  देता येईल असा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव तथा बुलडाण्याचे पालक सचिव श्यामलाल गोयल यांना देण्यात आला आहे.दरम्यान, त्या संदर्भाने सकारात्मक भूमिका गोयल यांनी घेतली असून शासन निर्णय काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. २० मे रोजी बुलडाण्यात पाणीटंचाई आढावा बैठकीदरम्यान त्यांनी हे संकेत दिले.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर घुगे यांनी   आढावा बैठकीत याबाबत मुद्देसुद माहिती त्यांना दिल्यानंतर गोयल यांनी हे संकेत दिले आहेत. तीन लाख खर्च मर्यादेत टंचाईची कामे करताना अडचण नाही. परंतू तात्पुरती नळ योजना, पुरक नळ योजनांना लागणारा खर्च हा त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्याची ई-निविदा काढता आधी जि. प.च्या कॅफोकडून मंजुरात घ्यावी लागते. ई-टेंडर काढतांना सात दिवसांची मुदत असते. प्रतिसाद न मिळल्यास नंतर पाच व पुन्हा तीन दिवस जातात. एकुण प्रक्रियेस तब्बल २५ दिवसांचा कालावधी लागतो. हीच प्रक्रिया जर थेट ग्रामपंचायतीला दहा लाखापर्र्यंतची कामे करण्यास दिल्यास बीओकडून हा प्रस्ताव थेट कॅफोकडे जाऊन अवघ्या पाच दिवसात टंचाई निवारणाची अशी कामे मार्गी लागू शकतात, असा या अधिकाºयाचा होरा आहे. त्यास अवर सचिव गोयल यांनीही प्रतिसाद दिला. बी-वन  करारनामा ग्रामपंचायतींशी करून अशी कामे दिल्या जाऊ शकतात. ५० हजार रुपयांवरील कामांसाठी प्रामुख्याने ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीने टंचाई निवारणाची कामे दिल्यास सध्या पद्धतीनुसार जे काम किमान २५ दिवसात होते ते अवघ्या ५ दिवसात होईल असा यंत्रणेचा दावा आहे.दुष्काळी स्थिती  जिल्ह्यात टंचाई निवारणाची कामे विलंबाने होत असल्याने त्यांना गती देण्यासाठी आता या प्रस्तावावर काय भूमिका घेतल्या जाते याकडे  दुष्काळ ग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार