योग्य उपचाराने जन्मजात दृष्टिदोषही दूर होतात : राहुल बाहेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:40+5:302021-06-20T04:23:40+5:30
बुलडाणा : नवीन तंत्रज्ञान, आधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून आता जन्मजात दृष्टिदोषही दूर होऊ शकतात. त्यासाठी योग्य उपचारांची आवश्यकता आहे. ...

योग्य उपचाराने जन्मजात दृष्टिदोषही दूर होतात : राहुल बाहेकर
बुलडाणा : नवीन तंत्रज्ञान, आधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून आता जन्मजात दृष्टिदोषही दूर होऊ शकतात. त्यासाठी योग्य उपचारांची आवश्यकता आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाने डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल बाहेकर यांनी केले. भादोला येथे शुक्रवारी (दि. १८) आयोजित नेत्रतपासणी शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात डॉ. राहुल बाहेकर यांनी १६० रुग्णांची नेत्रतपासणी केली; तसेच या रुग्णांना आवश्यक त्या औषधांचे वाटपही करण्यात आले.
यावेळी शरद सपकाळ, डॉ. अजय खर्चे, डॉ. शिवाजीराव निकम, सरपंच प्रमोद वाघमारे, उपसरपंच आमीन खासाब, अनिल इंगळे, गजानन चव्हाण, अनिल वायकोस, पोलीस पाटील सूर्यकांत गवई, मोहन सोनुने, संजय काळे, विजय राजगुरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शरद सपकाळ, समाधान बाहेकर, गौरव वानखेडे, किरण घाटे, प्रशांत देशमुख, प्रशांग बांगर, नीलेश जाधव, आदींनी औषध वितरणाचे काम केले. कोरोनाचे सर्व नियम पाळून सदर शिबिर पार पडले. शिबिराच्या यशस्वितेसाठी व्यवस्थापक वसंतराव निकम, साहेबराव भगत, श्रीकृष्ण ताकतोडे, पूनम ठेंग, सागर धनवटे, अजय चव्हाण, विशाल उबाळे, आदींनी परिश्रम घेतले.