प्रचार संपला

By Admin | Updated: October 14, 2014 00:31 IST2014-10-14T00:31:00+5:302014-10-14T00:31:00+5:30

बुधवारी मतदान; उमेदवारांचे फलक उतरवले; बुलडाणा जिल्ह्यात मूक प्रचाराचा बोलबाला.

Promotions ended | प्रचार संपला

प्रचार संपला

बुलडाणा : लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा, हक्क बजावण्याचा दिवस उद्यावर येऊ ठेपला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांसाठी होणार्‍या मतदानाकरिता आता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली. आज जाहीर प्रचार बंद झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेला राजकीय कलबलाट आता शांत झाला आहे. आचारसंहितेनुसार बोलका प्रचार संपला असला तरी आजची रात्र व उद्याचा दिवस व रात्री मूक प्रचाराचा ह्यबोलबालाह्ण राहील. विजयाची समीकरणे मांडण्यासाठी राजकीय नेते कुठलाही आवाज न करता कामाला लागले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांमध्ये प्रचाराचा धुराळा यावर्षीच्या निवडणुकीत अतिशय जोराचा होता. आपापल्या पक्षाच्या उमेदवारांकरिता मोठमोठय़ा राजकीय नेत्यांनी बुलडाण्यात पायधुळ झाडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री उमा भारती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडवणीस, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भारिप-बमसंचे अँड. प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे नेते हाजी शे. अराफात यांच्यासह प्रख्यात वक्ते बानगुडे पाटील व सिनेकलावंतांनीही प्रचाराला हजेरी लावून रंगत वाढविली. जिल्ह्यात एक-दोन अपवाद वगळले, तर कोणत्याही उमेदवाराने वैयक्तिक टीका केली नाही. प्रचाराचे मुद्दे हे स्थानिक व राज्यस्तरीय असे राहिल्याने वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपाला फारसे खतपाणी घातले गेले नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्या मंगळवारी सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी रॅली, पदयात्रा काढून म तदारांशी संवाद साधला, तर अनेक ठिकाणी शक्तिप्रदर्शन करून आपआपली उमेदवारी अधिक बळकट केली. 

*मतदानासाठी १२ हजार महसूल कर्मचारी तैनात

 मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे म्हणून जिल्ह्यातील ११९ मतदान केंद्रांच्या ठिकाणी सुव्यवस् था आणि अन्य प्रक्रियांसाठी पाच हजार पोलिस कर्मचारी-अधिकारी तैनात करण्यात आल्याची माहि ती जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये २0५ अधिकारी, ४६५ कर्मचारी, २२६ महिला पोलिस, ९00 पुरूष होमगार्ड, १00 महिला होमगार्ड यांचा समावेश आहे. त्यांची ने-आण करण्यासाठी २२५ वाहनांची व्यव्यस्था करण्यात आली आहे. याशिवाय मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी महसूल विभागाचे १२ हजार कर्मचारी काम करीत आहेत.

*आतापर्यंत एक कोटी रूपये पकडले

निवडणूक प्रचारकाळात पोलिसांनी ठिकठिकाणी वाहनांच्या केलेल्या तपासणीमध्ये आतापर्यंत १ कोटी ५२ लाख ६८ हजार रुपये पकडले. यापैकी मलकापूर मतदारसंघात ६८ लाख, तर चिखली येथे पकडलेली ८0 लाखांची रक्कम प्रमुख होती. याची चौकशी आयकर कार्यालयाकडून होत आहे. चिखली येथे पकडण्यात आलेली रक्कम ही चिखली अर्बन बँकेची असल्याचे सांगण्यात आले. त्यासंबंधी बँकेची कागदपत्रे तपासणीचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी दिली.

Web Title: Promotions ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.