शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

विवेकाधिष्ठित विद्वत्तेमुळे विकासाला चालना - ज्ञानेश्‍वर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:08 IST

विवेकाधिष्ठित विद्वत्ता ही सृजनात्मक विकासाला  चालना देण्यासाठी कारणीभूत ठरते. तीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यातून स्पष्ट होते. ग्रामगीता हे त्याचेच सार आहे, असे प्रतिपादन वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमाचे हरिभक्त परायण ज्ञानेश्‍वर महाराज वाघ यांनी येथे केले.

ठळक मुद्देपाचवे विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विवेकाधिष्ठित विद्वत्ता ही सृजनात्मक विकासाला  चालना देण्यासाठी कारणीभूत ठरते. तीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यातून स्पष्ट होते. ग्रामगीता हे त्याचेच सार आहे, असे प्रतिपादन वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमाचे हरिभक्त परायण ज्ञानेश्‍वर महाराज वाघ यांनी येथे केले.बुलडाणा येथील स्व. पंकज लद्दड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड मॅनेजमेंट स्टडीज तथा भारतीय विचार मंचच्या विदर्भ शाखेच्यावतीने बुलडाण्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, प्रत्येक विद्वान हे संत असतात; परंतु सर्वच विद्वान हे संत असू शकत नाहीत. संतांनी देव व माणसांना जागविण्याचे काम केले आहे. संत वाड्मय अजिर्त नसून प्रासादिक आहे. शस्त्रक्रियेशिवाय हृदय परिवर्तन करण्याची शक्ती त्यात आहे. संत वाड्मय मनोरंजन नव्हे, तर मनोमंथनासाठी आहे, अशी भावनाही  ज्ञानेश्‍वर महाराज वाघ यांनी व्यक्त केली. संमेलनाचे उद्घाटन रविवारी २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. प्रारंभी सकाळी ८.३0 वाजता ग्रंथदिंडीची परिसरातून परिक्रमा काढण्यात आली. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशिष चौबिसा, अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, साहित्य संमेलनाचे संयोजक डॉ.दीपक लद्दड, रवींद्र लद्दड, प्राचार्य प्रदीप जावंधिया, जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर, नगरसंघचालक बाळासाहेब देशपांडे, नगर सहसंघचालक प्रा.विजयराव जोशी, प्राचार्य शांताराम बोटे, डॉ. विकास बाहेकर, प्रा. मोरेश्‍वर देशमुख, विहिंप विदर्भ संघटक मंत्री अरुण नेटके, आ. हर्षवर्धन सपकाळ, प्रवीण चिंचोळकर, गिरीश दुबे उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांमध्ये ज्ञानदेवांची प्रतिभा, नामेदवांचा प्रचार, नाथंची प्रपंच, तुकोबारायांचा प्रतिकार असे सर्व गुण होते. माणूस जोडण्याचे व घडविण्याचे मानवतेचे काम राष्ट्रसंतांनी केले आहे, असे ज्ञानेश्‍वर महाराज वाघ शेवटी म्हणाले. सोबतच ग्रामगीता ही तुकडोजी महाराजांच्या मातृहृदयाला सुटलेला पान्हा आहे. प्रबोधनासह परिवर्तनाची ताकद त्यामध्ये आहे.गुरुकुंज मोझरीचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांचेही यावेळी  भाषण झाले. आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी राष्ट्रसंतांचे साहित्य संमेलन म्हणजे एकाच संताचे विचारांचे साहित्य संमेलन आहे. सर्व संतांचे विचार यात असतात, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा.सुभाष लोहे यांनी केले. डॉ. दीपक लद्दड यांनी राष्ट्रसंताचे विचार समाज प्रबोधन तरुण पिढीवर संस्काराचे बीजारोपण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने आमच्या संस्थेला विदर्भस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाल्याने आयोजकांचे आभार मानले. सूत्रसंचालन अर्चना देव यांनी केले. 

आजच्या शिक्षणाचा पाया राष्ट्रसंतांनी रचला उद्घाटनपर भाषणात बोलताना डॉ. राजेश जयपूरकर यांनी आजच्या आधुनिक शिक्षणाचा पाया राष्ट्रसंतांनी रचला. संत साहित्य आत्मशक्ती वाढविणारे असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाचा व कुटुंबांचा सार ग्रामगीतेत मांडला आहे. ही ग्रामगीता प्रत्येकाने वाचली पाहिजे. व्यक्ती विकासाच्या तथा जीवनाच्या प्रत्येक पैलूचा ग्रामगीतेच्या माध्यमातून अभ्यास करता येतो. त्यामध्ये या सर्व बाबींवर चिंतन झाले आहे, असे ते म्हणाले. सोबतच संत साहित्य अभ्यासक्रमात असले पाहिजे. त्यातून बालमनावर चांगले संस्कार रुजविल्या जातात, असे ते म्हणाले.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजbuldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी