खासगी संस्थांच्या शिक्षकांना प्रचार बंदी

By Admin | Updated: September 28, 2014 23:19 IST2014-09-28T23:19:24+5:302014-09-28T23:19:24+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश खासगी शाळा राजकीय व्यक्तींद्वारे संचालित.

Promoting ban on private organization teachers | खासगी संस्थांच्या शिक्षकांना प्रचार बंदी

खासगी संस्थांच्या शिक्षकांना प्रचार बंदी

बुलडाणा : खासगी संस्थांचे शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी वर्गांना राजकीय पक्षांचे कामकाज व प्रचार यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे शिक्षक सध्या राजकीय प्रचारापासून अलिप्त आहेत. मात्र यांच्या पडद्यामागून हालचाली सुरुच आहेत. जिल्ह्यातील बहुतांश अनुदानित खासगी शाळा ह्या राजकीय व्यक्तींच्या आहेत. त्यामुळे निवडणूक म्हटली की शिक्षक, प्राध्यापक व कमचार्‍यांचा प्राचारात मोठा सहभाग असायचा. विशेष म्हणजे ह्या राजकीय मंडळींना कार्यकर्त्यांपेक्षा अधिक विश्‍वास हा त्यांच्या कर्मचार्‍यांवर आहे. तसेच हा कर्मचारी वर्ग देखील सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यासाठी राजकीय प्रचारात खुलेआम राहायचा. परंतु आता असे करता येणार नाही. आयोगाद्वारा ही बाब गंभीरतेने घेण्यात आली आहे. प्रचार करताना आढळल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरुन गुन्हा दाखल होणार आहे.

Web Title: Promoting ban on private organization teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.