लाॅकडाऊनमध्ये लांबलेले विवाह मोजक्याच लोकांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:34 IST2021-04-27T04:34:41+5:302021-04-27T04:34:41+5:30

बुलडाणा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्याने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा ...

Prolonged marriages in lockdown are among the few | लाॅकडाऊनमध्ये लांबलेले विवाह मोजक्याच लोकांमध्ये

लाॅकडाऊनमध्ये लांबलेले विवाह मोजक्याच लोकांमध्ये

बुलडाणा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्याने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कडक निर्बंध लागू केल्याने परिणामी अनेक नवरदेव, नवरी यांचा पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्याने हिरमोड झाला आहे. त्यामुळे सध्या दोन वर्षांपासून लग्नसराईवर कोरोनाचे सावट असल्याने नाते जमविण्यासाठी ' हुंडा नको, फक्त मुलगी द्या,' अशी मागणी नवरदेव वधू पित्यांकडे करताना दिसत आहे.

एकदिवसीय लग्नावर भर

समाजात आजही अनेक जण वधू पक्षाकडे हुंड्याची तर मागणी करतातच शिवाय चांगले मंगल कार्यालय, एवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था अशा विविध मागण्या करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे वर पक्षाकडून फक्त आम्ही घरातील मोजके लोकच लोक येऊन वधूला घेऊन जाऊ, असे सांगून दोन तासाच्या लग्नावर भर देत असल्याचे चित्र आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडत असल्याने वधू पित्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होत आहे. अवास्तव खर्चाला फाटा देत साधेपणाने विवाह पार पाडण्यासाठी वर-वधू पित्याची धावपळ सुरू आहे.

Web Title: Prolonged marriages in lockdown are among the few

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.