शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आठ प्रकल्पांमधील निधीचा ‘खोडा’ दूर, १,२४६ कोटींचे प्रकल्प मार्गी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 17:58 IST

बळीराजा जल संजीवनी योजनेतंर्गत केंद्र सरकारने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांच्या कामासाठी भरीव निधीची दोन

नीलेश जोशीबुलडाणा : बळीराजा जल संजीवनी योजनेतंर्गत केंद्र सरकारने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांच्या कामासाठी भरीव निधीची दोन दिवसापूर्वीच तरतूद केल्याने बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार २४६ कोटी रुपये किंमत असलेल्या आठ प्रकल्पांची कामे मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे. निधीच्या अडचणीमुळे हे प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास निर्माण झालेली मोठी अडचण पाहता जिल्ह्याच्यादृष्टीने हा मोठा दिलासा आहे.मे २०१९ पर्यंत हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास बुलडाणा जिल्ह्यातील सिंचन क्षमतेमध्ये ४६ हजार ७३५ हेक्टरने वाढ होण्यास मदत होईल. दरम्यान, दोन हजार हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या प्रकल्पांचा यात समावेश असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत अंबाबरावा अभयारण्याच्या दहा किमी अंतराच्या पट्ट्यातील अर-कचेरी, आलेवाडी या प्रकल्पांचीही समस्या त्यामुळे निकाली निघाली आहे. बळीराजा जल संजिवनी योजनेतंर्गत बुलडाणा जिल्ह्यातील एक मोठा, एक मध्यम आणि आठ लघू प्रकल्पांचा तसा समावेश आहे.यात मोठ्या प्रकल्पांमध्ये जीगव, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा(३६४.३६ कोटी रुपये) (पालक अभियंता म्हणून बुलडाणा जिल्ह्यात आहे.), निम्न ज्ञानगंगा (१५९.५५ कोटी), आलेवाडी (१८८.५२ कोटी), अर-कचेरी (२३१.४७ कोटी), चौंढी (१९०.०१ कोटी), द्रुगबोरी (२२.४१ कोटी), बोरखेडी (४५.५७ कोटी), दिग्रस (६.६० कोटी (कोल्हापुरी बंधारा)) आणि राहेरा (३८.२८ कोटी) या प्रकल्पांचा समावेश आहे. पैकी जिगाव प्रकल्पाची सुमारे साडेसहा हजार कोटीवरून १२ हजार ६६२ कोटी रुपये किंमत झाली आहे.

सप्टेंबर २०१४ मधील अहवालाच्या पृष्ठभूमीवर राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रमातंर्गत जिगाव, निम्न ज्ञानगंगा, द्रुगबोरी या प्रकल्पांचा आधीच समावेश असून बळीराजा जल संजिवनी योजनेतंर्गत त्यांचा समावेश झाल्याने या प्रकल्पांच्या कामाला अधिक वेग येणार आहे. निम्न ज्ञानगंगा प्रकल्पातंर्गत बुलडाणा-खामगाव मार्गावरील उंच तलांकीय पुलाचेही काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामातील महत्त्वाची अडचण दूर झाली असून ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या दहा किलोमीटर परिसरात हा प्रकल्प येत असल्याने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या मान्यतेसाठीही दोन वर्षापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

नव्या भुसंपादन कायद्यामुळे किंमतीत वाढनवीन भुसंपादन कायद्यातंर्गत भूसंपादन केलेल्या जमीनीचा पाचपट मोबदला देण्याची तरतूद असल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पांच्या सुप्रमांनाही (सुधारीत प्रशासकीय मान्यता) मान्यता मिळाली आहे. त्यामुळेच जिगाव प्रकल्पाचीही किंमत आज रोजी साडेबारा हजार कोटींच्या घरात गेली आहे. अर-कचेरी आणि आलेवाडी हे प्रकल्प २०१५ दरम्यान ७७ कोटींच्या घरात होते ते आज अनुक्रमे २३१.४७ कोटी आणि १८८.५२ कोटी रुपयांवर गेले आहेत. चौंढी प्रकल्पाच्याकिंमतीमध्येही वाढ झाली आहे.