जवखेड खालसा येथील घटनेचा निषेध
By Admin | Updated: October 29, 2014 00:15 IST2014-10-29T00:15:21+5:302014-10-29T00:15:21+5:30
दलित कुटुंबियाच्या तिहेरी हत्याकांडाची सीबीआय चौकशीची बुलडाणा जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी.

जवखेड खालसा येथील घटनेचा निषेध
बुलडाणा : पाथर्डी तालुक्यातील जवखेड गावातील दलित कुटुंबियांच्या तिहेरी हत्याकांडातील सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशी ठोठावण्यात यावी, अशी मागणी आमदार हर्षवर्धन सपकाळ आदींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आज २८ ऑक्टोबर रोजी एक निवेदनातून केली.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेड तालुका येथील दलित समाजातील जाधव कुटुंबियांतील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला सात दिवस लोटल्यानंतरही पोलिसांना घटनेतील आरोपींना पकडण्यामध्ये अपयश आले. ही बाब खरंच निंदनीय असून, याबाबत निषेध व्यक्त करत घटनेची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, तसेच प्रकरणातील आरोपींना तत्काळ पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.