प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने विद्यूत बिलांची होळी करून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 04:16 PM2019-01-04T16:16:43+5:302019-01-04T16:18:39+5:30
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर विद्युत बिलांची होळी करण्यात येवून या वाढीव बिलाचा निषेध नोंदविण्यात आला.
मलकापूर : वेळेवर बिल न येणे, बिल वाढीव येणे असे प्रकार नेहमी घडतात. त्यातच चुकीची वाढीव बिले देवून ग्राहकांना वेठीस धरण्यात येत आहे. या विरोधात ४ जानेवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर विद्युत बिलांची होळी करण्यात येवून या वाढीव बिलाचा निषेध नोंदविण्यात आला.
सप्टेंबर २०१८ मध्ये झालेले संपूर्ण विज दर वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा निवेदनाद्वारे देण्यात आला. महावितरण वंष्ठपनीकडून ग्राहकांना देण्यात येणाठया विज बिलामध्ये अनेक प्रकारचे घोळ असून नाहक ग्राहकांना वाढीव व चुकीच्या बिलांचा भूर्दंड सोसावा लागत आहे. इंधन आकार, वीज आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार, इतर आकार, अतिरिक्त आकार अशा विविध प्रकारे विज बिलात रक्कमा वाढवून ग्राहकांना वाढीव बिले देण्यात येत आहे. वापरलेल्या विज बिला व्यतिरिक्त इतर विविध प्रकारे भूर्दंड लावून विज बिलाचा आकडा वाढवून ग्राहकांची एक प्रकारे लुटच विज वितरण कंपनीने चालविली आहे. त्यातच
सद्या हिवाळ्याचे दिवस असताना घरामध्ये पंखे, कुलर, एसी सारखी कोणतीही उपकरणे सुरू नसताना सुध्दा उन्हाळ्याप्रमाणेच विज बिले देण्यात येत आहेत. या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विद्युत बिलांची होळी करण्यात येवून, या वाढीव बिलाचा निषेध नोंदविण्यात आला. त्याचप्रमाणे सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आलेली विज दर वाढ तात्काळ रद्द न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुध्दा यावेळी एका निवेदनाद्वारे देण्यात आला. या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांचेसह शालीग्राम पाटील, बळीराम बावस्कर, देविदास बोंबटकार, शिवाजी भगत, कौतीक बोराडे, प्रमोद भिसे, दिपक अवसरमोल, ज्ञानदेव गावंडे, विनायक बोरले यासह आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)