३२ सदस्यांचे एकत्र कुटुंब साधतेय प्रगती

By Admin | Updated: May 14, 2014 23:57 IST2014-05-14T23:50:45+5:302014-05-14T23:57:56+5:30

एकत्र कुटुंब पद्धती लयास गेली; मात्र आजही अशी काही कुटुंब आहेत की ज्यांचे ३२ सदस्य एकाच छताखाली राहतात.

Progress of creating 32 families together | ३२ सदस्यांचे एकत्र कुटुंब साधतेय प्रगती

३२ सदस्यांचे एकत्र कुटुंब साधतेय प्रगती

बुलडाणा :आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात एका क्लीकवर जग आपल्या पुढय़ात उभे ठाकते. विज्ञानाने माणसे जवळ आली; पण संवाद कमी झाला. एकत्र कुटुंब पद्धती लयास गेली; मात्र आजही अशी काही कुटुंब आहेत की ज्यांचे ३२ सदस्य एकाच छताखाली राहतात. म्हणतात ना ह्यशेतात खत, गावात पत आणि कुटुंबात एकमतह्ण असलं की कुठलंच कुटुंब फुटत नाही. याचे जिवंत उदाहरण सांगळद येथील बोरले परिवार. हा परिवार गेल्या ५0 वर्षापासून एकत्र नांदतो आहे.

          ओंकार बोरले व गोदावरी बोरले यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना रामभाऊ, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी चार मुले, छबूबाई, बेबीबाई, शकुंतला व उषा या चार मुली. चारही मुली आज सासरी गेलेल्या आहेत. तर चार भावांपैकी रामभाऊ हे मलकापूर येथे टेलिफोन एक्सचेंजमध्ये नोकरीला होते. आता ते सेवानवृत्त झाले. त्यांना नीलिमा व नयना या दोन मुली व नितिन हा एक मुलगा. नितीनचे संगीता नामक मुलीशी लग्न झाले. त्यांना एक मुलगी आहे. लक्ष्मण व उर्मिला या दाम्पत्याला नारायण, ङ्म्रीकृष्ण, मधुकर व सदाशिव ही चार मुले आहेत. नारायण व शालिनी या दाम्पत्याला वैष्णवी, संस्कृती या दोन मुली व अर्णव हा एक मुलगा, ङ्म्रीकृष्ण व मीनाक्षी या दाम्पत्याला यट्ठोश व रितेश ही दोन मुले, मधुकर व शारदा तसेच सदाशिव संजीवनी हेही याच कुटुंबाचे घटक आहेत.त्यांचा तिसरा मुलगा भरत. भरत व इंदूबाई या दाम्पत्याला अर्जुन नामक मुलगा व मोहिनी ही एक मुलगी आहे. चौथा मुलगा शत्रुघ्न. त्यांची पत्नी कावेरी. या दाम्पत्याला शीतल नामक मुलगी व ङ्म्रीरंग हा एक मुलगा आहे. असे हे ३२ जणांचे कुटुंब १९६५ पासून आजपावेतो एकत्र आहेत.

         इतके जण एकत्र राहत असल्यामुळे भांड्याला भांडे लागणारच, असा समज होऊ शकतो; मात्र येथे ही म्हण लागू होत नाही. कारण या कुटुंबात कधीही भांडणतंटा होत नाही. या कुटुंबाकडे वडिलोपार्जीत नऊ एकर जमीन होती. त्यात भर घालत ही शेती आता ५0 एकरावर जाऊन पोचली आहे. या कुटुंबाकडे १५ म्हशी, दोन गाई आहेत. म्हशींची देखरेख व दूध विक्रीपर्यंतची सगळी कामे नारायण यांच्याकडे आहेत. गाईचे नियोजन हे ङ्म्रीरंगकडे, शेतीकामाचे नियोजन ङ्म्रीकृष्ण व अर्जुन यांच्याकडे असून, लक्ष्मण व शत्रुघ्न हे त्यांना मदत करतात. घरातील संपूर्ण आर्थिक व्यवहार भरत यांच्याकडे आहेत. मलकापूर येथील रामभाऊ बोरले वगळता आजची २३ ते २४ सदस्यांचा स्वयंपाक एकत्र होतो. एकत्र कुटुंब पद्धतीत जिद्द, मेहनत याला नियोजनाची जोड असेल तर शून्यातही विश्‍व निर्माण होऊ शकते, हे बोरले परिवाराने समाजापुढे ठेवले आहे. सोबतच त्याला दुग्ध व्यवसायाची जोड तसेच पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत बोरले कुटुंबाच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. हे कुटुंब समाजासाठी आदर्शवत असे ठरले आहे. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देत मोताळा तालुक्यातील सांगळद येथील बोरले कुटुंबियाने आपली आर्थिक उन्नती साधली आहे.

        ३२ जणांचे हे कुटुंब सांगळदसारख्या छोट्या गावात एकत्रीतपणे नांदते. कुटुंबांतील सर्वच महिला- पुरुष शेतीची कामे करतात, त्यामुळे त्यांना शेतीसाठी शेतमजुराची आवश्यकता भासत नाही. नांदुरा रस्त्यावर तिघ्रा फाट्यावर बोरले कुटुंबाजवळ ओलीताची शेती आहे.सिंचनाच्या माध्यमातून भाजीपाला, मिरची, उन्हाळी मका, असे विविध पीक घेतल्या जाते. कापसाचे सिंचनाखालील लागवडही मोठय़ा प्रमाणावर केल्या जात आहे. सुरूवातीला त्यांनी जुना ट्रॅक्टर विकत घेतला; मात्र एवढी मोठी शेती एका ट्रॅक्टरवर भागत नाही म्हणून जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे कर्ज काढून पुन्हा दुसरा नवा ट्रॅक्टर २00४ मध्ये खरेदी केला.दुग्ध व्यवसाय व शेतीच्या उत्पन्नाच्या जोरावर बोरले कुटुंबांनी मोताळ्याच्या बाजारपेठेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

Web Title: Progress of creating 32 families together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.