गुरू रविदास महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक
By Admin | Updated: February 4, 2015 01:28 IST2015-02-04T01:28:44+5:302015-02-04T01:28:44+5:30
गुरू रविदासांच्या स्मारकासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचे आमदार सपकाळ यांचे आश्वासन.

गुरू रविदास महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक
बुलडाणा : समतावादी राजसत्तेचे पुरस्कर्ते गुरू रविदास महाराज जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध चौकातून फिरल्यानंतर मिरवणुकीचा समारोप गांधीभवन येथे करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आ. हर्षवर्धन सपकाळ, प्रमुख मार्गदर्शक म्हणून बापूसाहेब मोरे, तर अध्यक्षस्थानी प्रा.आर.एस. बशिरे उपस्थित हाते. चर्मकार समाज जगभरात मोठय़ा प्रमाणात विखुरला असून, अद्यापही हा समाज आपल्या न्याय हक्कापासून वंचित आहे. त्यामुळे समाजाच्या हक्कासाठी आमदार निधीतून बुलडाणा शहरात गुरू रविदासांचे स्मारक व्हावे, यासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या उद्घाटपर भाषणातून केले. तर प्रमुख मार्गदर्शक बापूसाहेब मोरे यांनी समाजबांधवांना संबोधित करताना आता काळ आणि वेळ बदललेला आहे. आपणही आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे, समाजाच्या हितासाठी आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डी.आर. माळी, तर संचालन प्रकाश खनसरे यांनी केले.