वेबसाईटची कासवगती बनली समस्या
By Admin | Updated: November 19, 2014 01:23 IST2014-11-19T00:03:22+5:302014-11-19T01:23:53+5:30
१0 वीचे ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्यासाठी खामगाव तालुक्यातील शाळांची कसरत.

वेबसाईटची कासवगती बनली समस्या
खामगाव (बुलडाणा): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेद्वारा इयत्ता १0 वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून, शेवटची तारीख २0 नोव्हेंबर आहे; मात्र गेल्या तीन दिवसांपासून शिक्षण मंडळाची वेबसाईटची कासवगती असल्याने अर्ज भरणारे शाळा प्रशासन त्रस्त झाले आहे. अद्याप ४0 टक्केहून अधिक शाळांचे परीक्षा अर्ज भरणे राहिले असल्याने त्यातच वेबसाईट बंद सारखीच असल्याने याचा विचार करता परीक्षा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शाळा प्रशासनाकडून होऊ लागली आहे.
यावर्षीपासून इयत्ता १0 वीचे परीक्षा अर्जसुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात येवून अर्ज भरणे सुरु झाले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून परीक्षा अर्ज भरण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरसुद्धा तयार करण्यात आले आहे. याद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने परीक्षा अर्जामध्ये विद्यार्थ्यांंची माहिती भरण्यात येत आहे.
यासाठी राज्यातील सर्वच शाळांमधील कर्मचार्यांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले होते; मात्र इयत्ता १२ वीच्या तुलनेत १0 वीच्या विद्यार्थ्यांंची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने अर्ज भरताना अडचणी निर्माण होत आहेत. परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम दिनांक २0 नोव्हेंबर असताना अद्याप अनेक शाळांचे अर्ज भरणे राहिले आहेत. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून मंडळाच्या वेबसाईटची गती कमी झाली आहे.
एकाचवेळी अनेक शाळांकडून अर्ज भरणे सुरु करण्यात आले आहे. यामुळे वेबसाईटची गती कमी असेल. याबाबतची माहिती शिक्षण मंडळ पुणे यांना देण्यात आली असल्याची माहीती परीक्षा मंडळाचे विभागीय सचिव प्रदीप अभ्यंकर यांनी दिली.