खासगी प्रवासी बसचा अपघात; २६ जखमी
By Admin | Updated: August 30, 2016 01:28 IST2016-08-30T01:28:17+5:302016-08-30T01:28:17+5:30
खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन २६ जण जखमी झाल्याची घटना.

खासगी प्रवासी बसचा अपघात; २६ जखमी
वडनेर(जि. बुलडाणा), दि. २९: इंदोरवरून अमरावतीकडे जाणार्या खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन २६ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास धानोरा ते काटी फाटा दरम्यान घडली.
इंदोर येथून एमपी 0७ पी 0३४९ क्रमांकाची खासगी बस रविवारी रात्री प्रवासी घेऊन अमरावतीला निघाली होती. दरम्यान, सोमवारी सकाळच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाला. या अपघातात सत्तारखान हसनखान रा. ताजनगर अमरावती हे गंभीर जखमी झाले, तर २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडल्याने अर्धातास वाहतूक विस्कळीत झाली होती.