मटका जुगार अड्ड्यावर छापा

By Admin | Updated: April 20, 2017 00:15 IST2017-04-20T00:15:35+5:302017-04-20T00:15:35+5:30

अमडापूर- प्राप्त माहितीच्या आधारे अपर पोलीस अधिक्षक श्वेता खेडकर यांनी बुधवारी उंद्री येथील लाखनवाडा मार्गावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमालासह चार जणांना अटक केली.

Print on gambling spot | मटका जुगार अड्ड्यावर छापा

मटका जुगार अड्ड्यावर छापा

अमडापूर : येथून जवळच असलेल्या ५ कि.मी.अंतरावर उंद्री येथे लाखनवाडा रोडवर वरली मटका खेळवीत असल्याच्या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांच्या पथकाने छापा करून ३३०० रु.चा माल जप्त करून चार जणांविरुद्ध कार्यवाही केली आहे.
१९ एप्रिल २०१७ रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान उंद्री येथे लाखनवाडा रोडवर खुलेआम वरली मटका जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरून अपर पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांच्या पथकातील पी.एस.आय. भागवत पाटील, रवींद्र लेंडवे, एच.सी.संजय लहाने, भास्कर वानखेडे, एन.पी.सी.चैतन्य बाळसराफ, पी.सी.राम राऊत, जाकीर यांनी उंद्री लाखनवाडा रोडवर वरली मटका जुगारावर छापा टाकला. यावेळी आरोपी गजानन घाटगे, गजानन श्रीराम बारगळ, त्र्यंबक दुधाळे, शेख रोशन शेख हसन सर्व रा.उंद्री यांना रंगेहाथ पकडून त्यांचे जवळून नगदी ३३७० रु. वरली मटका साहित्य जप्त करुन गुन्हा दाखल करुन अटक केली. या छाप्यामुळे लपत छपत वरली मटका खेळविणाऱ्यांच्या तंबुत मात्र घबराट पसरली आहे.

Web Title: Print on gambling spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.