सोनाळा, बावनबीर येथे जुगारावर छापा
By Admin | Updated: September 2, 2015 23:51 IST2015-09-02T23:51:12+5:302015-09-02T23:51:12+5:30
चार हजाराचा मुद्देमाल जप्त; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल.

सोनाळा, बावनबीर येथे जुगारावर छापा
खामगाव : तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत बावनबीर व सोनाळा येथे अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने जुगारावर छापा टाकून चार हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना बुधवारी घडली. अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या पथकाने बावनबीर येथे छापा टाकला असता विलास दामोधर (वय ५४) हा सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून वरली मटका नावाचा जुगार खेळताना आढळून आला. त्याच्याजवळून ३ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दुसर्या घटनेत सोनाळा येथील सुनील कडू उंडे (वय २५) याला पैशाच्या हारजीतवर वरली मटका नावाचा जुगार खेळताना पकडून त्याच्याजवळून १ हजार ३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघा आरोपींविरूद्ध तामगाव पोलीस स्टेशनमध्ये कलम १२ (अ) मुजुकाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.