शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

प्रधानमंत्री पिक विमा योजना ठरतेय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:54 IST

एकीकडे अद्याप पेरण्याच सुरू झालेल्या नाहीत आणि दुसरीकडे विमा भरण्याची २४ जुलैची दिलेली मुदत, यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरण्याचीच चिन्हे आहेत.

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आॅनलाईन विमा काढण्याची मुदत २४ जुलैपर्यंत ठरवून देण्यात आलेली आहे. परंतु दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा पाहता, पेरण्यांना उशीर होत आहे. सध्या विम्याची साईट सुरू असली, तरी शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होताना दिसत नाही.गतवर्षीचा अनुभव पाहता, तब्बल १८ ते २० जुलैपर्यंत पेरण्या सुरू होत्या. यावर्षी अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे पेरण्यांना गतवर्षी प्रमाणेच उशीर होऊ शकतो. एकीकडे अद्याप पेरण्याच सुरू झालेल्या नाहीत आणि दुसरीकडे विमा भरण्याची २४ जुलैची दिलेली मुदत, यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरण्याचीच चिन्हे आहेत.यावर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा काढण्यास सुरूवात झाली आहे. पिक काढण्याची मुदत २४ जुलै पर्यंत आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षीही पावसाळा उशीरा सुरू झाल्याने तब्बल १८ ते २० जुलै पर्यंत पेरण्या सुरू होत्या. त्यामुळे अनेक शेतकºयांना पिक विमा काढणे शक्य झाले नाही. नंतर काही दिवसांसाठी मुदत वाढविण्यात आली होती. परंतु साईट बंद राहत असल्याने त्याचाही फारसा फायदा झाला नाही. यावर्षी सध्या पिक विमा काढण्याकरीता साईट सुरू आहे. परंतु त्याचा सध्या काहीही लाभ शेतकºयांना होताना दिसत नाही. यावर्षी अद्यापपर्यंत पावसाचे आगमन झाले नाही.त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यावर्षी पेरण्यांना उशीर होण्याची शक्यता आहे. पेरण्या आटोपल्यानंतर सर्वच शेतकरी पिक विमा काढण्यासाठी गर्दी करणार आहेत. त्यामुळे शेवटच्या आठवड्यात पिक विमा भरण्यासाठी शेतकºयांची मोठी गर्दी होऊन शेतकºयांना पिक विम्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे पिकाला संरक्षण देण्यासाठी असलेली प्रधानमंत्री पिकविमा योजना शेतकºयांसाठी मृगजळ ठरण्याची चिन्हे आहेत.उशीरा होणाºया पेरण्या लक्षात घेता, त्यानुसारच पिक विमा काढण्याची मुदत ठरवून द्यावी व नियोजन करावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.मुदतवाढीनंतर राज्यावर बोजा!प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत केंद्राने ठरवून दिलेल्या मुदतीच विमा काढणे बंधनकारक राहते. राज्य शासन त्यांच्या पातळीवर मुदत वाढवून देतेही; परंतु मुदतवाढीच्या काळात काढण्यात आलेल्या विम्याचे पैसे देण्यास केंद्राकडून नकार देण्यात येतो. त्यानंतर राज्य सरकारला विशेष तरतूद करून मुदतवाढीच्या काळात पिकविमा काढलेल्या शेतकºयांना विम्याची रक्कम द्यावी लागते. यामुळे शेतकºयांना पिकविम्याची रक्कम मिळण्यास विलंब होतो, असा शेतकºयांचा अनुभव आहे.गतवर्षी पावसाचे आगमन उशीरा झाल्याने पेरण्या उशीरा झाल्या. यानंतर पिकविमा काढण्यासाठी एकच गर्दी झाली. यात वेबसाईटही बंद राहत असल्याने पिकविमा काढण्यात अडचणी निर्माण झाल्या.- नंदकिशोर देशमुखशेतकरी, एकलारा बानोदा ता.संग्रामपूर.यावर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा काढणे सुरू झाले आहे. २४ जुलै ही मुदत ठरवून देण्यात आली आहे. शेतकºयांनी शक्यतो मुदतीच्या आत पिक विमा काढावा.- नरेंद्र नाईकजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीkhamgaonखामगावFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा