अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला!लोकमत न्यूज नेटवर्क

By Admin | Updated: June 2, 2017 00:31 IST2017-06-02T00:31:56+5:302017-06-02T00:31:56+5:30

धाड :गोर सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद रामदास राठोड यांनी धाड पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सदर लग्नविधी थांबविला.

Prevention of minor girl marriages! | अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला!लोकमत न्यूज नेटवर्क

अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला!लोकमत न्यूज नेटवर्क

धाड : ग्राम दुधाजवळील श्रीक्षेत्र मर्दडी देवी संस्थान येथे १ जून रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह पार पडणार होता; मात्र गोर सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद रामदास राठोड यांनी धाड पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सदर लग्नविधी थांबविला.
ठाणेदार संग्राम पाटील, ना.पो.का.प्रकाश दराडे, प्रवीण इंगळे, गजानन मोरे, प्रताप भुतेकर आदीनी घटनात्मक गाठून घटणाऱ्या प्रकाराची शहानिशी केली. त्याठिकाणी कोळाराम राठोड (वाशिम) यांच्या मुलीचे लग्न संबंधात नातलगासह त्या ठिकाणी हजर होते, तर संतोष किसन केकाल व वर संजय किसन केकाल हे आपल्या नातलगासह तेथे उपस्थित होते; मात्र पोलीस पोहोचल्यामुळे विवाह पार पडला नाही. या ठिकाणी पोलिसांनी वर-वधू पक्षांच्या मंडळीचे जबाब नोंदवून यांची नोंद घेतली आहे.

Web Title: Prevention of minor girl marriages!