शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे अडकली गाळात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:23 IST

Buldhana News : पावासाळ्याच्या तोंडावर नगर पालिकांची स्वच्छतेची कामे सध्या संथगतीने सुरू आहेत.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पावासाळ्याच्या तोंडावर नगर पालिकांची स्वच्छतेची कामे सध्या संथगतीने सुरू आहेत. अनेक पालिकांकडे निधीची कमतरता असल्याने मान्सूनपूर्व नालेसफाईची कामेही गाळात अडकली आहेत. काही पालिकांकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांनाही नियमीत स्वच्छतेच्या कामातच पूर्ण केल्याचे दाखविल्या जात आहे. कोरोना विषाणू संसर्गामूळे नगर पालिकांची कर वसूली झालेली नाही. अनेक पालिकांची घर पट्टी, पाणी पट्टीची थकीत कराची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे पालिकांचे वर्षाचे आर्थिक नियाेजन काेलमडले आहे. त्याचा परिणाम नगर पालिकांकडून होणाऱ्या विविध कामांवर दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे, मात्र अनेक भागात अद्यापह कामांना सुरूवाती झालेली नाही. निधी नसल्याने मान्सूपूर्व कामेही स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून केली जात नसल्याचे दिसून येते.

बुलडाणा पालिकेची टोलवाटोलवी!बुलडाणा शहराचा विस्तार १४ चौरस किमी आहे. बुलडाणा नगर पालिकेकडे जवळपास ११७ सफाई कर्मचारी आहेत. परंतू नगर पालिकेकडून स्वच्छतेच्या या कामाबाबत टोलटोलवी होत असल्याचे दिसून येते. शहरातील अनेक भागातील सांडपाण्याच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. नियमीत कचरा गोळा करणारी वाहने शहरात फिरतात, परंतू मान्सूनपूर्व नालेसफाईचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मेहकर येथे पालिकेचे काम पूर्ण  झाल्याचा दावा!मेहकर नगर पालिकेने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केल्याचा दावा करण्यात येत आहे. मेहकर नगर पालिकेकडे ७० सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. याठिकाणी मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आल्याची माहिती नगर पालिकेकडून देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक भागातील नाल्या घाणीने तुंबलेल्या दिसून येतात. शहरातील इमामवाडा चौक, गवळी पुरा, बाजार परिसर, कुरेशी मोहल्ला, लोणार वेस या भागातील सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये गाळ तसाच अडकेला आहे.

बुलडाणा शहरातील नियमीत कचरा उचलणे व इतर सफाईची कामे सुरू आहेत. मान्सूनपूर्व कामांमध्ये नालेसफाईची कामे करण्यात येत आहेत. निधीची अडचण आहे.सचिन लघाने, उपमुख्याधिकारी, नगर पालिका, बुलडाणा.

मेहकर नगर पालिकेची मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. कंत्राटी कर्मचारी घेतलेले आहेत. १५ व्या वित्त आयोगातील निधीचाही वापर करण्यात येत आहे.सचिन गाडे, मुख्याधिकारी, नगर पालिका मेहकर.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर