शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात मान्सुनपुर्व पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:11 IST

बुलडाणा: मान्सूपूर्व पावसाने सात जून रोजी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मान्सूपूर्व पावसाने सात जून रोजी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळे खामगाव व बुलडाणा शहर परिसरात काहीसे नुकसान केले. दरम्यान, यंदाच्या मोसमातील हा पहिलाच पाऊस ठरला. त्याची सरासरी ४.१ मिमी नोंद झाली आहे.बुलडाणा शहरातही मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वेगवान वाºयासह जवळपास अर्धास हा पाऊस बरसत होता. पावसाचे आगमन होताच शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला तो पहाटेच सुरळीत झाला. या पावसामुळे शहरातील काही ठिकाणची टीनपत्रे उडाली. बालाजी मंदिरामधील यज्ञ कुंडाचे छत उडून गेले. पोलिस ग्राऊड परिसरातील काही झाडे वादळी पावसामुळे उन्मळून पडली. मात्र पडलेल्या या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.दुसरीकडे खामगाव तालुक्यातही पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये शहरातील कॉटन मार्केटमधील फिडर बंद पडल्याने शहराचा वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. जलंब नाका परिसरातील झाडाची फांदी तुटल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यातील पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाने मेहकर व बुलडाणा तालुक्यात दमदार हजेरी लावली. मेहकर तालुक्यात १२.७ मिमी तर बुलडाणा तालुक्यात १०.३ मिमी या पावसाची नोंद झाली. खामगावमध्ये ८.६ मिमी, लोणारमध्ये सात मिमी, चिखलीमध्ये ६.९ मिमी देऊळगाव राजात २.४ मिमी तर सिंदखेड राजा तालुक्यात ४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेगाव आणि मोताळा तालुक्यातही तुरळकप्रमाणात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी ४.१ मिमी पाऊस ८ जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात पडला होता. (प्रतिनिधई)

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस