शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांच्यावर हल्ला, रात्रीच पोलिसांत ठिय्या

By सदानंद सिरसाट | Updated: September 29, 2022 10:45 IST

हल्लेखोरावर कारवाईच्या मागणीसाठी रात्रीच पोलिस ठाण्यात ठिय्या व घोषणाबाजी

शेगाव (बुलढाणा) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष  प्रशात डिक्कर यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक गावाजवळ घडली.येत्या ४ ऑक्टोबर रोजी आयोजित शेतकरी मोर्चा च्या पार्श्वभूमीवर जवळा बुद्रुक येथे शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे कार्यकर्त्यासह बुधवारी सायंकाळी गेले होते.

या ठिकाणची सभा आटवून परत निघाले असता रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवून मारहाण  केल्याचा आरोप खुद्द  डिक्कर यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. याशिवाय रात्री शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घडलेल्या प्रकरणाबाबत माहिती दिली. या ठिकाणी मारहाण करणाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी करत काही वेळ स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला व घोषणाबाजी केली.

शेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी येत्या ४ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय शेगाव येथे शेतकरी मोर्चा आयोजित आहे. या मोर्चाची माहिती देण्यासाठी  जवळा बुद्रुक येथे गेलो. तेथून  परतल्यानंतर रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते श्याम अवथळे व इतरांनी  गाडी अडवून  मारहाणीचा प्रयत्न केला. दरम्यान माझेवरील वार मधात येवून कार्यकर्त्यांनी वार स्वतःवर घेतले.  रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी आहे.  शेतकरी संघटना मोडकळीस आणण्याच  काम तुपकर करीत आहेत.- प्रशांत डिक्करविदर्भ अध्यक्ष स्वाभिमान शेतकरी संघटना

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाbuldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस