वीजपंपाचा पुरवठा खंडितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:32 IST2021-08-29T04:32:51+5:302021-08-29T04:32:51+5:30
विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लालपरीची मोताळा : दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले असून, अनेक भागात अद्यापही बसेस बंदच आहेत. त्यामुळे बाहेरगावी ...

वीजपंपाचा पुरवठा खंडितच
विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लालपरीची
मोताळा : दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले असून, अनेक भागात अद्यापही बसेस बंदच आहेत. त्यामुळे बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अवघड होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना लालपरीची प्रतीक्षा आहे.
बुलडाणा तालुक्यात ५३.६६ टक्के पाऊस
बुलडाणा : बुलडाणा तालुक्यात ५३.६६ टक्के पाऊस झाला आहे. यासह चिखली, सिंदखेड राजा, खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदुरा, मोताळा या तालुक्यात पाऊस समाधानकारक आहे. त्यामुळे सध्या पिकांची परिस्थिती चांगली आहे.
सोयाबीन पिकावर अळीचा हल्ला
देऊळगाव मही : मागील वर्षी नव्याने आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त झाले होते. यंदा सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस असून पीक परिस्थिती जोमदार आहे.
विमा संरक्षण कोणाला?
बुलडाणा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते; परंतु मागील वर्षी नुकसान होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्यामुळे विमा संरक्षण कोणाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गणेशोत्सवाची लगबग सुरू
बुलडाणा : गणेशोत्सव जवळ आला असल्याने मूर्ती बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा कोरोनामुळे हा उत्सवही साधेपणानेच साजरा होणार असल्याचे संकेत आहेत. तरीसुद्धा गणरायाची मूर्ती बनविण्यासाठी कारागिरांची धडपड सुरूच आहे.