बुलडाणा शहरातील वीजपुरवठा बंद
By Admin | Updated: November 12, 2014 00:11 IST2014-11-12T00:11:28+5:302014-11-12T00:11:28+5:30
जुने रोहित्र बदलविण्याच्या कामामुळे भारनियमन.

बुलडाणा शहरातील वीजपुरवठा बंद
बुलडाणा : शहरातील अनेक वॉर्डातील वीजपुरवठा ११ नोव्हेंबर रोजी सकाळपासून बंद असल्याने नागरिकांना विविध समस्येला सामोरे जावे लागले. त्यामुळे काही व्यापार्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. बुलडाणा शहरात महावितरण कंपनीकडून विविध भागातील जुने रोहित्र बदलविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेकवेळा भारनियमन केले जाते. आज या कामामुळे जवळपास अध्र्या शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळपासून शहरातील सुवर्ण नगर, बसस्थानक परिसर, जुना गाव, भडेच ले आऊट येथील वीजपुरवठा बंद होता. सदर वीजपुरवठा सायंकाळी ६ वाजेदरम्यान सुरू झाला; मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा बंद झाल्याने रोष व्यक्त होत आहे.